नागपुरात तयार होणार पुणे मेट्रोचे कोच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 August 2019

नागपूर ः पुणे मेट्रो रेल्वेसाठी नागपुरात कोचेस तयार करण्यात येणार आहे. देशात प्रथमच मेट्रो रेल्वे कोचेससाठी ऍल्युमिनिअमचा वापर करण्यात येईल. ऍल्युमिनिअमच्या कोचेस पुणे मेट्रोचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले. पुणे मेट्रोच्या कोचेस तयार करण्याचे कंत्राट भारतीय स्वामित्व असलेली टिटागढ फिरेमा कंपनी तयार करेल. पुणे मेट्रो रेल्वेचे कोच तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आलेल्या होत्या. यात भारतीय स्वामित्व असलेली टिटागढ फिरेमाने कंत्राट मिळविले. पुणे मेट्रो रेल्वेसाठी एकूण 102 कोचेसची आवश्‍यकता आहे.

नागपूर ः पुणे मेट्रो रेल्वेसाठी नागपुरात कोचेस तयार करण्यात येणार आहे. देशात प्रथमच मेट्रो रेल्वे कोचेससाठी ऍल्युमिनिअमचा वापर करण्यात येईल. ऍल्युमिनिअमच्या कोचेस पुणे मेट्रोचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले. पुणे मेट्रोच्या कोचेस तयार करण्याचे कंत्राट भारतीय स्वामित्व असलेली टिटागढ फिरेमा कंपनी तयार करेल. पुणे मेट्रो रेल्वेचे कोच तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आलेल्या होत्या. यात भारतीय स्वामित्व असलेली टिटागढ फिरेमाने कंत्राट मिळविले. पुणे मेट्रो रेल्वेसाठी एकूण 102 कोचेसची आवश्‍यकता आहे. यातील 25 टक्के कोचेस इटली येथील कोचेसनिर्मिती प्रकल्पात तयार केले जाणार आहे. उर्वरित 75 टक्के कोचेस नागपूर येथील महामेट्रोच्या कोचनिर्मिती प्रकल्पात तयार केले जातील. आतापर्यंत भारतातील विविध मेट्रो रेल्वे प्रकल्पामध्ये स्टेनलेस स्टीलचे कोच वापरले जात होते. परंतु पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या निमित्ताने भारतात पहिल्यांदाच ऍल्युमिनियम कोचेस वापरल्या जाणार आहेत. ऍल्युमिनियमचे कोच हे स्टेनलेसच्या तुलनेत हलके, अधिक ऊर्जा कार्यक्षम आणि सुंदर असे असतील. ऍल्युमिनिअमचे कोचेस भारतातील मेट्रोकरिता बदल घडणारा असेल, असा दावा महामेट्रो प्रशासनाने केला आहे. पुणे मेट्रोला सुरुवातीला 3 कोचेस वापरण्यात येतील. त्यानंतर गरजेनुसार त्यात सहापर्यंत वाढ करण्यात येईल. शारीरिकदृष्ट्या अपंग असलेले प्रवासी सहजपणे प्रवास करू शकणार असून मोबाईल व लॅपटॉप चार्जिंगची सुविधादेखील या कोचेसमध्ये करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशानुसार आतील व बाह्य भागात डिझाइन केले जाईल. पुणे मेट्रो किमान 95 किमी प्रति तास गतीने धावणार असून यात 925 प्रवासी एका वेळेस प्रवास करणार असल्याचेही महामेट्रो प्रशासनाने नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coach of Pune Metro to be built in Nagpur

फोटो गॅलरी