घरात पाळला कोब्रा अन्‌ माकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

अकोला - घरात चक्क विषारी कोब्रा नाग आणि मांडूळ सापासह दोन माकडे पाळणाऱ्यावर वन विभागाने कारवाई करून आरोपीस अटक केले. आरोपीकडील वन्य प्राणी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अकोला - घरात चक्क विषारी कोब्रा नाग आणि मांडूळ सापासह दोन माकडे पाळणाऱ्यावर वन विभागाने कारवाई करून आरोपीस अटक केले. आरोपीकडील वन्य प्राणी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील महात्मा फुले नगरात एक व्यक्ती घरात विषारी कोब्रा, मांडूळ साप आणि दोन माकडे पाळत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्या आधारे वन विभागाने गुरुवारी दुपारी सोनाजी बाणाजी वैरागड (वय ७५) यांच्या घरावर छापा टाकला असता घरामध्ये दोन माकडे बांधलेली व एक कोब्रा नाग बरणीत आणि मांडूळ साप लाकडी पेटीत बंदिस्त असल्याचे आढळून आले. याबाबत सोनाजी वैराडे यांना विचारले असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. आरोपीला वन्य प्राण्यासह ताब्यात घेऊन वन विभागाच्या कार्यालयात आणून आरोपीची कसून चौकशी करण्यात आली. आरोपीवर भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ९ आणि ३९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वैरागड याच्या घरात बरणीत असलेला कोब्रा नाग तब्बल साडेचार फूट लांबीचा आहे. 

Web Title: cobra and monkey in the house