esakal | अख्ख्या विदर्भात थंडीची लाट; नागरिकांच्या अंगात भरली हुडहुडी; शहरातही ठिकठिकाणी पेटल्या शेकोट्या
sakal

बोलून बातमी शोधा

Cold increased in vidarbha region Vidarbha marathi batmya

चार दिवसापूर्वी अचनक पावसाचे आगमन झाले आणि त्यानंतर वातावरणात गारठा निर्माण झाला. पडत असलेल्या कडाक्‍याच्या थंडीपासून बचाव करण्याकरिता सायंकाळच्या पाच वाजता पासूनच शहरातील नागरिक घरात बंदिस्त होत आहेत.

अख्ख्या विदर्भात थंडीची लाट; नागरिकांच्या अंगात भरली हुडहुडी; शहरातही ठिकठिकाणी पेटल्या शेकोट्या

sakal_logo
By
दशरथ जाधव

आर्वी (जि.वर्धा) : गत चार दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्‍याच्या थंडीमुळे परिसर गारठलेला आहे. हुडहुडी भरणारी थंडी वाढतच आहे. परिणामी ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातसुद्धा जागोजागी शेकोट्या पेटतांना दिसून येत आहे.

चार दिवसापूर्वी अचनक पावसाचे आगमन झाले आणि त्यानंतर वातावरणात गारठा निर्माण झाला. पडत असलेल्या कडाक्‍याच्या थंडीपासून बचाव करण्याकरिता सायंकाळच्या पाच वाजता पासूनच शहरातील नागरिक घरात बंदिस्त होत आहेत. कामगार बोचऱ्या थंडीत अंगात भरलेली हुडहुडी दूर करण्याकरिता ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून गप्पा मारत बसलेले आढळतात.

हेही वाचा - थरार! सदरमध्ये भरचौकात महिलेला जिवंत जाळले; भांडण सोडविणे बेतले जिवावर

तापमानाचा पारा 27 अंशावरून अचानक 10 अंशापर्यंत खाली आला आणि कपाटात बंदिस्त असलेले स्वेटर, मफलर, कानटोपरे, हातामोजे, पायमोजे, दुलाई ब्लॅंकेट आदी उबदार वस्तू बाहेर निघाल्या. रात्री पारा खाली आला की वातावरणातील गारवा वाढतो आणि ग्रामीण भागातील शेतात, गावातील चौकाचौकात आणि घराघरासमोर शेकोट्‌या पेट घेतात. 

हळूहळू उब घेण्याकरिता शेकोटी लगत गर्दी जमते ग्रामपंचायत निवडणुका असो, रस्त्याचे उद्‌घाटन असो वा शेतकऱ्यांचे आंदोलन यावर जोरदार चर्चा झडतात. वातावरण विश्‍लेषांकानी अजून काही दिवस तरी ही बोचरी थंडी जाणार नाही असा अंदाज वर्तवीला आहे. मात्र थंडी बोचरी असली तरी या निमित्त लोक एकत्र येतात ही जमेची बाजू आहे.    

जाणून घ्या - खासदार नवनीत राणा संतापल्या: 'त्या' ठाणेदार आणि बीट जमदारावर गुन्हे दाखल...

गहू-हरभरा जोमात

काश्‍मीर खोऱ्यात गत काही दिवसांपासून होत असलेल्या बर्षवृष्टीमुळे उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्याने परिसरातील तापमानात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. या हाड गोठवणाऱ्या थंडीत गहू व हरभऱ्याकरिता पिकाला पोषक ठरत असून पीक जोमात आहे. यांमुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. रात्री थंडीतसुद्धा ओलित करण्याकरिता शेतकरी शेतात जाताना दिसून येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image