‘त्या’ मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचे उघड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

घुग्घुस येथील खून प्रकरण - तिघांना अटक, प्रेमप्रकरणाचीही किनार
घुग्घुस - येथील अमराई वॉर्डातील शर्वरी शाह या मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात गुरुवारी (ता. ६) उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी प्रतापसिंग रमेश सिंग आणि आकाश राहुल देवगडे यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे तपासात समोर आले.

अमराई वॉर्ड क्रमांक २ येथील रहिवासी शर्वरी बानो अबरार शाह हिचे घराशेजारी राहत  असलेल्या एका अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध होते. यातून त्यांच्या नेहमीच गाठीभेटी व्हायच्या. ४ एप्रिल रोजी प्रियकराने तिला भ्रमणध्वनी करून बंद असलेल्या वेकोलि कोळसा  खाण परिसरात बोलविले होते. शर्वरी तेथे गेली असता  प्रतापसिंग रमेश सिंग आणि आकाश  देवगडे तेथे आधीपासूनच हजर होते. दोघेही दिसताच शर्वरीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघांनीही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर रॉड व दगडाने शर्वरीच्या डोक्‍यावर वार करून  तिचा चेहरा विद्रुप केला. बुधवारी (ता. ५) सकाळी काही युवक मातीच्या ढिगाऱ्यावर सेल्फी काढण्यासाठी गेले असता शर्वरीचा मृतदेह आढळून आला होता.

या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू करताच अटकेच्या भीतीने अल्पवयीन मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तो बचावला. रुग्णालयात उपचारानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने प्रताप रमेश सिंग आणि आकाश राहुल देवगडे यांची नावे सांगितली. त्यांनाही अटक करण्यात आली. तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रताप रमेश सिंग आणि आकाश राहुल देवगडे या दोघांना १० तारखेपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्यात आले. तर अल्पवयीन आरोपीची निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली.

Web Title: Collective atrocities that marked its' girl