आमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी पाठवा

file photo
file photo

नागपूर : एकेकाळी महाविद्यालये विद्यार्थ्यांनी तुडुंब भरली राहायची. ढ विद्यार्थीच क्‍लासेस लावायचे. आज कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांसह संस्थाचालक मोठमोठ्या शिकवणी वर्गासमोर विद्यार्थी प्रवेशासाठी लोटांगण घालत आहेत. यावरून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया फक्त नाममात्र असल्याचे स्पष्ट होते.
शिकवणी वर्गांवर आळा बसावा यासाठी राज्यभरातील पाच शहरांमध्ये मागील वर्षापासून अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेलाही आयटी तज्ज्ञांच्या मदतीने छेद देण्यात आला. सातत्याने मेरिट देणाऱ्या नामवंत महाविद्यालयांच्या जागा शिल्लक राहिल्या तर अलीकडे उदयास आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के प्रवेश झाले. गतवर्षी पहिलीच वेळ असल्याने अनेक नामवंत महाविद्यालयांना याचा फटका बसला. निकालाचाही टक्का घसरला.
यावर्षी कुठलीही "रिस्क' न घेता छोट्या कनिष्ठ महाविद्यालयांपासून तर शहरातील बड्या कनिष्ठ महाविद्यालयांनी कंबर कसली आहे. शहरातील नामवंत महाविद्यालयांचे प्राचार्य च संस्थाचालक खासगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्यांकडे जाऊन त्यांच्याकडे प्रवेशासाठी विनवणी करीत आहेत. शिकवणी वर्गाच्या संचालकांना ते पटल्यास त्याच कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात येतो. या प्रकाराने अकरावी प्रवेश प्रक्रिया खऱ्या अर्थाने नाममात्र ठरल्याचे दिसून येते. शहरातील काही नामवंत कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी केल्यास हे सत्य निश्‍चित बाहेर येईल. त्यामुळे बऱ्याच ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरातील दुसऱ्याच कोपऱ्यात प्रवेश घेत असल्याचे दिसून येते.  
क्‍लासेस ठरवितात प्रवेश
दहावीच्या परीक्षेनंतर बारावीनंतरचे करिअर म्हणून खासगी शिकवणी वर्गाकडे पालकांची धाव असते. त्यामुळे महाविद्यालय कुठले असले तरी शिकवणी वर्ग टॉपचे असावे असाच जवळपास पालकांचा कल असतो. त्यामुळे अकरावीपूर्वीच खासगी ट्यूशन क्‍लासेसमध्ये पालकांची गर्दी असते. शिकवणी घेणाऱ्या संस्थाच कुठल्या विद्यार्थ्याने कुठल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा हे ठरवतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com