महाविद्यालयीन जोडप्यांना रूतले 'रोज डे'चे काटे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

'व्हॅलेंटाईन डे'चा आठवडा सुरू झाला आहे. त्यामुळे प्रेमीयुगुल आपल्या प्रेयसी व प्रियकराला खूश करण्याचा प्रयत्न करीत आहे. सात दिवस वेगवेगळे दिवस असल्याने दिवस साजरा करण्यासाठी एकांत शोधत आहे. चंद्रपुरात "रोज डे'निमित्त प्रेमीयुगुल एका लॉजवर गेले. त्यांना पोलिसांनी पकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली.

चंद्रपूर : 14 फेब्रुवारीला जागतिक प्रेमदिन. तत्पूर्वी, आठवडाभर वेगवेगळे दिवस प्रेमीयुगुल साजरे करीत असतात. त्यातीलच एक "रोज डे'... मात्र, चंद्रपुरातील काही महाविद्यालयीन जोडप्यांना या दिवसांचे काटे चांगलेच रूतले. तब्बल 13 जोडपी रासलीला करताना एका लॉजवर सापडली आणि एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या कारवाईनंतर युवतींना समज देऊन सोडण्यात आले. युवकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

चंद्रपूर-नागपूर या वर्दळीच्या मार्गावर रेणुका गेस्ट हाऊस आहे. या परिसरात शहरातील नामांकित महाविद्यालय सुद्धा आहे. खासगी शिकवणी संस्थाही आहे. अनेक दिवसांपासून या गेस्ट हाऊसमधील खोल्या प्रेमीयुगलांना एका तासासाठी भाड्याने दिले जात होत्या. विशेषतः: महाविद्यालयीन युवक आणि युवती येथे एकांतवासाठी जात होते. या गेस्ट हाऊसमधील अनैतिक कारभाराची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि दुपारी एक वाजताच्या सुमाराला छापा टाकला.

जाणून घ्या - बोंबला, भागवतासाठी आला अन् बायको घेऊन पळाला

यावेळी गेस्ट हाऊसच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये 13 जोडपी आढळून आली. चौकशी केली असता ते महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे समोर आले. या सर्वांना रामनगर पोलिस ठाण्यात आणले. गेस्ट हाऊस मालक त्रिवेदी आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. मुलींना समज देऊन सोडून देण्यात आले. मुलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

कोणतीही शहानिशा नाही

या गेस्ट हाऊसच्या खोल्या कुठलीही शहानिशा न करता भाड्याने दिल्या जात होत्या. गेस्ट हाऊसचा परिसर चंद्रपूर शहरातील शैक्षणिक दृष्ट्‌या महत्त्वाचा परिसर आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकवर्गातही चिंता पसरली आहे. "रोज डे'निमित्ताने अनेक जोडपी एकांतवासासाठी येथे आल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: College student in Chandrapur went to Lodge on Valentine's Day