अनाथालयातील मुलींनी साकारल्या रंगीबेरंगी वस्तू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

नागपूर : कलश कवर, देवाचे मुकुट, पूजा साहित्य थाळी, पोथीकव्हर, पेपर कव्हर, आकर्षक भेटवस्तू, डेकोरेटेड दिवे, रेडीमेड रांगोळी, मोबाईल कव्हर अशा अनेक वस्तूंची निर्मिती श्रद्धानंद अनाथालयातील मुलींनी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर केली आहे. श्रद्धानंदपेठेतील श्रद्धानंद अनाथालयात दोनदिवसीय हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. कुटुंब न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश मीरा खडक्कार यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. 

यावेळी सुनीता मुद्दीअर, सरिता कौशिक, एन. व्ही. शर्मा उपस्थित होते. अनाथालय संस्थेच्या सचिव गीतांजली बुटी यांच्या मार्गदर्शनात अनाथलायातील मुलींनी विविध डिझायनर वस्तूंचे प्रशिक्षण घेऊन वस्तूंची निर्मिती केली. दिवाळीसाठी लागणाऱ्या आकर्षक वस्तू, आकाशदिवे, शोभेच्या वस्तू, पूजा साहित्य अशा अनेक वस्तू प्रदर्शनात आहेत. अनाथालयातील 25 मुलींनी प्रदर्शनात स्टॉल लावले आहेत. मागील अनेक दिवसांपासून मेहनत घेऊन मुलींनी वस्तूंची निर्मिती केली. नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन, मुलींना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन बुटी यांनी केले आहे. प्रदर्शन उद्या (शुक्रवार) रोजी सकाळी साडेदहा ते रात्री आठ यावेळेत खुले राहील. अतिशय माफक दर हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असल्याचे शिक्षिका साधना कालसर्पे यांनी सांगितले. रत्ना महल्ले, रेखा वाघमारे, प्रमिला देशभ्रतार, देविका उके यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Colorful objects decorated by the girls in the orphanage