esakal | बच्चू कडूंच्या निर्देशानुसार धान्य वाटपासाठी समिती
sakal

बोलून बातमी शोधा

Committee on Grain Distribution at Akola as instructed by Bachu Kadu

कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत बाहेर गावावरुन आलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना घरपोच धान्य पुरवठा करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिले आहेत.

बच्चू कडूंच्या निर्देशानुसार धान्य वाटपासाठी समिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या कुटूंबात बाहेरगावाहून (मुंबई, पुणे, यवतमाळ, नागपूर इ.) पाहूणे (व्यक्ती) आले असतील अशा कुटूंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरीत करण्यात येणारे धान्य घरपोच द्यावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत. सदर आदेशानुसार कार्यवाही करण्यासाठी पाच सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे.

कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत बाहेर गावावरुन आलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना घरपोच धान्य पुरवठा करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन ही यंत्रणा राबवेल व गावोगावी तसेच शहरी भागातही होत असलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे घरपोच धान्य व वैद्यकीय सेवा पोहोचवेल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार अशा लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्याने त्यांचे तीन महिन्यांचे धान्य घरपोच वितरण करण्यासाठी पाच सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे.

सरपंच समितीचे अध्यक्ष
सदर समितीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी संंबंधित गावातील सरपंचांना सोपवण्यात आली आहे. संबंधित गावातील स्वस्त धान्य दुकानदार त्याचा सदस्य सचिव असेल. त्यासोबतच पोलिस पाटील, तलाठी व आरोग्य सेवक समितीचे सदस्य असतील. 
 

loading image