"कॉमन रिव्ह्यू मिशन'कडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

नागपूर - राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील निरीक्षणासाठी केंद्राचे कॉमन रिव्ह्यू मिशन (सीआरएम) पथक उपराजधानीत धडकले. जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहातअधिकाऱ्यांनी आढावा घेतला. विशेष म्हणजे अभियान प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचा शेरा मिशनने दिला.

नागपूर - राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील निरीक्षणासाठी केंद्राचे कॉमन रिव्ह्यू मिशन (सीआरएम) पथक उपराजधानीत धडकले. जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहातअधिकाऱ्यांनी आढावा घेतला. विशेष म्हणजे अभियान प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचा शेरा मिशनने दिला.

नागपूर जिल्ह्यातील आरोग्यविषयक सुविधांचा तसेच राबवण्यात आलेल्या योजनांचा "आढावा' घेण्यासाठी डॉ. जोया अल्ली रिजवी यांच्या नेतृत्वात 9 जणांचे सीआरएम पथक दौऱ्यावर आले. आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमेश नावाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई तसेच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे
अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महापालिकेतर्फे शहरात राबवण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांबाबतीत पथकाने नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोग्य विभागांतर्गत उपराजधानीसह जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांतर्गतकुपोषण, बालमृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश आले नसल्याचे पथकाने नमूद केले.

क्षयरुग्णांच्या संख्येसोबतच नियंत्रण आणण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची पथकाने माहिती घेतली. दुपारी चारला या पथकातील दोघांनी नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयातील सोयी-सुविधांची पाहणी केली. यावेळी मनोरुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे, डॉ. नितीन गुल्हाने उपस्थित होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित नगरकर अनुपस्थित असल्याची चर्चा येथे होती. मनोरुग्णालयात "मेंटल हेल्थ प्रोग्राम'अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती तेथील अधिकाऱ्यांकडून घेतली.

"डागा'सह कामगार रुग्णालयाचे निरीक्षण
उपराजधानीत सर्वाधिक प्रसूती डागा स्मृती शासकीय रुग्णालयात होतात. ही बाब केंद्रीय पथकाच्या लक्षात आणून देण्यात आली. याशिवाय जननी शिशुसुरक्षा योजना, पोषण पुनवर्सन प्रकल्पाचा आढावा पथकाने घेतला. यानंतर सोमवारीपेठेतील राज्य कामगार रुग्णालयाची पाहणी केली.

Web Title: Common Review Mission from inspecting