संचारबंदीचे सर्रास उल्लंघन; मास्क, सोशल डिस्टन्सिंगही नाही, पहा कुठे घडला हा प्रकार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण भागातील काही नागरिकांकडून स्वतःच्या व दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करता तोंडाला मास्क न लावता गावातून दिवस रात्र कोणाचीही भीती न बाळगता मनसोक्त फिरत आहेत. परिणामी संचारबंदीचे उल्लंघन होताना दिसत आहे. कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजार असल्याने जमावबंदी व संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे.

भांबेरी (जि. अकोला) : कोरोना महामारीशी दोन हात करण्यासाठी केंद्र शासनाकडून संचारबंदी लागू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन करण्याची घोषणा केली. इतकी गंभीर परिस्थिती असताना सुद्धा तेल्हारा तालुक्यातील भांबेरी परिसरात नागरिकांडून संचारबंदीचे सर्रास उल्लंघन केल्या जात आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचीही पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा- विदर्भातील कोरोना नमुन्यांची तपासणी एम्स, आयजीएमसीमध्ये

सर्व आदेश बसले धाब्यावर
तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण भागातील काही नागरिकांकडून स्वतःच्या व दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करता तोंडाला मास्क न लावता गावातून दिवस रात्र कोणाचीही भीती न बाळगता मनसोक्त फिरत आहेत. परिणामी संचारबंदीचे उल्लंघन होताना दिसत आहे. कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजार असल्याने जमावबंदी व संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. दरम्यान परिसरातील पंचायत समिती, ग्रामपंचायती व संबंधित विभागाने आपल्या स्थरावरून वारंवार दवंडी, लाऊडस्पीकर व इतर प्रसार माध्यमाव्दारे सूचना दिल्या आहेत. असे असताना देखील नागरिक संचारबंदी व जमावबंदीची पायमल्ली करताना दिसून येत आहेत.

सुरक्षित अंतर न ठेवता चौकाचौकात बसून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत आहेत. तालुक्यातील पोलिस प्रशासन सुद्धा वारंवार नागरिकांना विनाकारण बाहेर पडू नका अशा सूचना व विनंती करीत आहेत. मात्र, नागरिक याकडे दुर्लक्ष करीत विनाकारण दुचाकीवरून फिरत आहेत. तालुक्यातील गावे व लोकसंख्येच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाची मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने, रिकामटेकड्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलिस प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.

पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे
संचारबंदी व जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. मास्क न बांधता नागरिकांनी गावात फिरू नये, विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.
-विकास देवरे, ठाणेदार, तेल्हारा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Communication violations; Not even masks, social distance