तक्रारकर्त्याच्या नातेवाइकाचा मृत्यू

तक्रारकर्त्याच्या नातेवाइकाचा मृत्यू
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या अतिदक्षता विभागात एका खासगी पॅथॉलॉजीच्या तंत्रज्ञ नियमबाह्य रुग्णाचे नमुने घेत होता. ही बाब उघडकीस आणणाऱ्या रुग्णाच्या नातेवाइकाला येथील सुरक्षा रक्षकाने मारहाण केली. मात्र, अतिदक्षता विभागात भरती असलेल्या तक्रारकर्त्या नातेवाइकाच्या रुग्णाला रात्री अचानक वॉर्ड क्रमांक 47 मध्ये हलवले. मात्र, या महिला रुग्णाला हलवताच उपचारादरम्यान मृत्यू झाला. अत्यवस्थ प्रकृती असताना जनरल वॉर्डात हलविण्याची गरज नव्हती, असा आरोप करीत खासगी पॅथॉलॉजीचे दलाल पकडून दिल्यामुळेच इतर वॉर्डात हलवले असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. मात्र, वैद्यकीय अधीक्षक यांनी रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याने हलविण्यात आले असल्याचे सांगितले.
यशोधरा जगदीश असे रविवारी मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. तिच्यावर मेडिकलच्या अतिदक्षता वॉर्ड क्रमांक 24 मध्ये उपचार सुरू होते. सोमवारी या रुग्णाच्या शेजारी दुसऱ्या रुग्णाचे नमुने एका खासगी प्रयोगशाळेचा तंत्रज्ञ घेत होता. अतिदक्षता विभागात अशाप्रकारे रक्त तपासणारे दलाल असल्याचे प्रकरण उजेडात आणण्याचा प्रयत्न राहुल जगदीश याने केला. नातेवाइकाने ही माहिती अतिदक्षता विभागाच्या बाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानाला दिली. जवानाने संतप्त होत तक्रारकर्त्याच्या कानशिलेत लगावली. नातेवाइकाने भ्रमणध्वनीवर पोलिसांना या घटनेची तक्रार दिली. त्यानंतर अजनीतील एक पोलिस कर्मचारी येथे पोहोचला. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या जवानासह खासगी तंत्रज्ञावर कारवाई बडगा उगारून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करू अशी तंबी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com