बालिकेच्या हत्याप्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोगाकडून दखल

लिंगा ः पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करताना बाल हक्‍क संरक्षण आयोगाच्या सदस्य वृषाली देशपांडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्‍ताक पठाण व पोलिस अधिकारी.
लिंगा ः पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करताना बाल हक्‍क संरक्षण आयोगाच्या सदस्य वृषाली देशपांडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्‍ताक पठाण व पोलिस अधिकारी.

कळमेश्वर (जि.नागपूर) : लिंगा गावात पाचवर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेची राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली. घटनेची सखोल माहिती आणि कारवाईचा तपशील समजून घेण्याकरिता आयोगाच्या वृषाली देशपांडे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्‍ताक पठाण यांनी गुरुवारी (ता. 12) तहसील कार्यालयामध्ये विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली.


लिंगा येथील मृत बालिकेच्या कुटुंबातील सदस्यांची घेतली भेट
आयोगाच्या सदस्या वृषाली देशपांडे म्हणाल्या की, महिलांची समाजातील स्थिती व प्रतिष्ठा सुधारण्याबाबत शासन, प्रशासनाकडून विविध उपाययोजना करणे गरजेचे असून शाळेमध्ये शिकत असलेल्या 12 ते 14 या वर्षांच्या मुलींवर विशेष लक्ष केंद्रित करून नेमक्‍या या मुलींच्या अडचणी समजून घेणे आवश्‍यक आहे. यावेळी लिंगा गावांमध्ये जाऊन मृत मुलीच्या कुटुंबाला आयोगाच्या सदस्यांनी भेट दिली व त्यांच्यासोबत न्याय होईल, याबाबत आश्वासन दिले.

बैठकीला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे, तहसीलदार सचिन यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी सरंबळकर, कळमेश्वर तालुक्‍यातील संपूर्ण शाळेचे मुख्याध्यापक, खंडविकास अधिकारी महेश्वर डोंगरे, सावनेरचे पोलिस निरीक्षक अशोक कोळी, कळमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती मुळूक, तालुका आरोग्य अधिकारी दीपा कुलकर्णी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी दीपक मेहेत्रे, गटशिक्षणाधिकारी मंगला गजभिये, तालुक्‍यातील अंगणवाडी सेविका, शाळांचे शिक्षक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com