Loksabha 2019 : आचारसंहिता भंगप्रकरणी प्रेमासाई महाराजांवर गुन्हा

complaint filed against Pramasai Maharaj for Code of Conduct violacion
complaint filed against Pramasai Maharaj for Code of Conduct violacion

लोकसभा 2019
यवतमाळ : निवडणूक विभागाची परवानगी न घेता रॅली काढून, वाहनावर स्वत:चे छायाचित्र असलेले पोस्टर व मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने भाड्याने करून बेकायदेशीरपणे पैसे खर्च करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक विभागाने सुनील नटराजन नायर ऊर्फ प्रेमासाई महाराज यांच्यावर सोमवारी (ता. 18) रात्री 9 वाजता दरम्यान लोहारा येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

सुनील नटराजन उर्फ प्रेमासाई महाराज यांनी अपक्ष उमेदवार म्हणून सोमवारी दुपारी 13 दरम्यान यवतमाळ-वाशीम लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी जात असताना त्यांनी रॅली काढली. त्यांच्या रॅलीत अंदाजे 50-60 चारचाकी वाहने होती. तसेच मोठ्याप्रमाणात जनसमुदाय उपस्थित होती.

वाहनांच्या मागील व पुढील काचांवर स्व:ताचे छायाचित्र व प्रेमासाई ट्रस्ट नाव लिहिलेले पोस्टर्स होती. मोठ्या प्रमाणात वाहने भाड्याने करून त्यांनी पैसे खर्च करून लोकसभा निवडणूक 2019 मध्ये आदर्श आचारसंहितेचा भंग केला. तसेच जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश क्रं. गृह शाखा डेस्क 12 कावि/479/2019 दिनांक 11/03/2019 चे उल्लंघन केले. त्यावरून सुनील नटराजन नायर (प्रेमासाई महाराज) रा. गुरुवाणी ले-आउट वाघापूर, यवतमाळ यांचेविरुद्ध पोलिस स्टेशन लोहारा येथे अपराध क्र. 81/2019 कलम 171 (एच), भादंवि. सह. क्रं.143,135 म. पो. का. सह क्रं. 232/177 मोवा. का. प्रमाणे नोंद करण्यात आला आहे. भरारी पथकप्रमुख सूरज राठोड यांनी याबाबत तक्रार केली आहे. पुढील तपास ठाणेदार सचिन लुले करीत आहेत.

मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याने कार्यकर्ते स्वत:हून समर्थनासाठी आले होते. मी त्यांच्या वाहनांवर कोणताही खर्च केला नाही. एका अपक्ष उमेदवाराच्या मागे लोकांचे मोठ्याप्रमाणात पाठबळ दिसल्याने मी निवडणूक लढू नये, यासाठी दबाब आणला जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी समूहाने जाण्याबाबत पोलिसांना परवानगी मागितली होती. सकाळपासून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या परवानगीनुसारच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलो होतो. 
-प्रेमासाई महाराज, यवतमाळ.


प्रेमासाई महाराज यांनी केले शक्तिप्रदर्शन -
सुनील नटराजन नायर ऊर्फ प्रेमासाई महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन केले. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील त्यांचे समर्थक वाहनांसह यवतमाळात दाखल झाले होते. 50 ते 60 वाहने एका रांगेत निघाले. पहिल्या जिपमध्ये प्रेमासाई महाराज स्वत: हात उंचावून लोकांना अभिवादन करीत होते. यावेळी हजारांवर त्यांच्या समर्थकांची उपस्थिती होती. हे सर्व कार्यकर्ते स्वत:च्या खर्चाने आल्याची माहिती प्रेमासाई महाराज यांनी सांगितले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com