तीन वर्षांच्या निकालाची अट रद्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नागपूर : राज्यातील 12 व 24 वर्षे सेवा पूर्ण झालेले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणीसाठी पात्र ठरतात. शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी देताना त्यांच्या विषयाचा आणि वर्गाचा तीन वर्षांचा निकाल तपासून बघण्याचा प्रयोग शिक्षण विभागाच्या वतीने घेतला गेला. मात्र, यावर शिक्षक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने ही अट शिक्षण विभागाने रद्द केली आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील एक अशा शिक्षकासाठी हा प्रयोग राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला होता. यासंबंधीचे आदेश प्रादेशिक विद्या प्राधिकरण तसेच जिल्हा शैक्षणिकने सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्थांना दिले होते. 31 ऑगस्टपर्यंत या शिक्षकांचा अहवाल राज्याच्या विद्या प्राधिकरणाकडे सादर करावयाचा होता. अहवाल सादर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एका अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. मात्र, शिक्षक संघटनांनी या निर्णयाचा विरोध सुरू केला. वेतनश्रेणीचा संबंध शिक्षकांच्या निकालाशी जोडून वेतनश्रेणीपासून शिक्षकांना वंचित ठेवण्याचे षड्‌यंत्र रचल्याचा आरोप संघटनांनी केला. यावर भाजप शिक्षक आघाडी, शिक्षक भारती, राष्ट्रवादी शिक्षक संघ आणि इतर संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Condition of three-year results canceled