वाहकाने बसमध्ये केला मुलीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

आर्णी (जि. यवतमाळ) : एसटी बसचा प्रवास सुखकर प्रवास म्हणणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या वाहकानेच धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना कोपरा फाटा ते आर्णी यादरम्यान गुरुवारी (ता.एक) दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे प्रवासीवर्गात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी वाहक भगवान हरसुले (वय 37, रा. पोहरादेवी) याला अटक करण्यात आली आहे. आर्णी येथील 16 वर्षीय मुलगी नातेवाइकासह पुसद येथून आर्णीला येत होती. दिग्रस येथून आर्णीचा प्रवास सुरू असताना बसमध्ये गर्दी झाली. या गर्दीचा फायदा घेत वाहकाने विनयभंग केला. पीडितेने आर्णी पोलिस ठाणे गाठून या प्रकाराबाबत तक्रार दिली. त्यावरून वाहक भगवान हरसुले याच्याविरुद्घ गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई आर्णीचे ठाणेदार यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात जमादार दिनेश जाधव यांनी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: conductor tried to molest minor girl in bus