विदर्भ : भाजपला धक्‍का, कॉंग्रेस, राष्ट्रवादीला अनपेक्षित यश | Election Results 2019

File photo
File photo

नागपूर : विदर्भातील 62 जागांचे निकाल बहुतांश ठिकाणी स्पष्ट झाले आहेत. या विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशेपारचा नारा देऊन सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला विदर्भात मोठा धक्‍का बसला आहे. 2014 निवडणुकीमध्ये 44 जागा जिंकून कॉंग्रेसला भुईसपाट केले होते. मात्र, ते यश या निवडणुकीमध्ये मिळताना दिसून येत नाही. पूर्व विदर्भातील बहुतांश जागांवर भाजपने यश मिळविले होते. मात्र, त्याच जागा मिळविताना भाजपला घाम फुटला. चंद्रपूर, राजुरा, चिमूर या त्यांच्या हक्‍कांच्या जागांवर कॉंग्रेसने उमेदवारांनी थेट लढत दिली. भंडारामध्ये भाजप एकही जागा मिळविता आली नाही. सर्वांचे लक्ष लागलेल्या साकोली मतदारसंघात परिणय फुके आणि नाना पटोले यांच्या अटीतटीची लढत झाली. तीच स्थिती तूमसरमध्ये आहे. चरण वाघमारे या अपक्ष उमेदवाराने भाजपला तिसऱ्या क्रमांकावर फेकले. तर गोंदियात जिल्ह्यातील अपक्षाने भाजपला गोंदिया तुल्यबळ लढत दिली. आमगावमध्ये भाजप पराभूत झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील 12 जागांवर चुरशीची लढत बघायला मिळाली. नागपूर ग्रामीणमधून भाजपला दोन जागा गमाविण्याची वेळ आली. काटोलमधून अनिल देशमुख यांनी विजयश्री खेचून आणली. तर रामटेकमधून आशीष जायस्वाल या शिवसेना बंडखोरांने विजय मिळविला. कॉंग्रेसचे सुनील केदार यांनी आपला गड राखला आहे. कामठी भाजपच्या हातून जाते की काय?, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. उमरेडमध्येही तीच स्थिती झाली. भाजप उमेदवार सुधीर पारवे यांना कॉंग्रेसचे उमेदवार राजू पारवे यांनी दरदरून घाम फोडला आणि विजयी झाले. नागपूर शहरातील भाजपने दोन जागा गमावल्या आहेत. यात उत्तर नागपूरमधून कॉंग्रेसचे नितीन राऊत विजयाच्या मार्गावर आहेत. त्यांनी मोठी लीड घेत आहेत. तर पश्‍चिम मतदारसंघातून कॉंग्रेसचे विकास ठाकरे विजयी झाले आहेत. पूर्वमध्ये कृष्णा खोपडे, मध्यमधून विकास कुंभारे आणि दक्षिण विधानसेत मोहन मते निवडून आले. पश्‍चिम-दक्षिणमध्ये मुख्यमंत्री विजयी झाले आहेत. यवतमाळ विधानसभेमध्ये चुरस निर्माण झाली होती. येथे मदन येरावार यांनी विजय मिळविला. विद्यमान आमदार मदन येरावार यांच्यापुढे कॉंग्रेसचे बाळा मदांगुळकर यांनी मोठे आव्हान निर्माण केले होते. वणी येथेही भाजपपुढे कॉंग्रेसने आव्हान केले. अमरावती येथे भाजपचे सुनील देशमुख यांच्याविरोधात सुलभा खोडके विजयी झाल्या. प्रहारने दोन जागांवर विजय मिळविला आहे. मेळघाटातून राजकुमार पटेल, अचलपूरमधून बच्चू कडू विजयी झाले आहेत. तर कृषिमंत्री अनिल बोंडे यांना पराजयाचे तोंड पहावे लागले. दर्यापुरात कॉंग्रेसचे बळवंत वानखडे विजयाच्या जवळपास आहेत. तिवस्यामध्ये कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर विजयी झाल्या.

वऱ्हाडात महायुतीचे यश
अकोला येथेही भाजपला मोठा धक्‍का बसला आहे. अकोला पश्‍चिममधील गोवर्धन शर्मा विजयी झाले. तर मुर्तीजापूर येथून वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभाताई अवचार यांनी तगडी लढत दिली. वाशीममध्ये भाजप, बुलडाण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. एकंदरीत वऱ्हाडात 15 पैकी 13 जागांवर महायुतीने यश मिळविले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com