काँग्रेसने भाजपला आशीनगरमध्ये रोखले - वनवे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

नागपूर - शहरात सर्वाधिक सदस्य असल्याने भाजपला महापालिकेच्या सर्व दहा झोनमध्ये आपले सभापती बसवायचे होते. मात्र, काँग्रेसने आशीनगर झोनमध्ये भाजपला रोखल्याचे काँग्रेसचे पक्षनेते तानाजी वनवे यांनी सांगितले. याकरिता पक्षातर्फे व्हीप काढण्यात आला. संदीप सहारे यांना राजकीय डावपेच माहिती नसल्याने ते बिनबुडाचे आरोप करीत असल्याचेही वनवे म्हणाले.

मंगळवारी महापालिकेच्या झोन सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात आली. आशीनगर झोनमध्ये सर्वाधिक संख्याबळ बसपकडे होते. फोडाफोडी करून भाजप राजकीय खेळी करण्याची शक्‍यता होती. आम्ही यंदा आधीच अंदाज घेतला. आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मतविभाजनात भाजपची लॉटरी लागू नये याकरिता वेळेवर उमेदवार उभा केला नाही. यामुळेच बसपचा उमेदवार येथून निवडून येऊ शकला. भाजपचे शहरात १०८ सदस्य आहेत.  नऊ झोनमध्ये त्यांचे सभापती आहेत. आशीनगर मात्र त्याला अपवाद ठरले. पक्षाची मते फुटू नये याकरिता व्हीप काढावा लागतो. संदीप सहारे यापूर्वी काँग्रेसचे गटनेते होते. त्यांना त्यांच्या कार्यकाळात निवडणुकीचा अनुभव आला नसावा. म्हणून गैरसमजातून त्यांनी आरोप केले  असावे, असेही वनवे यांनी सांगितले. मागील निवडणुकीतही झोनमध्ये उमेदवार दिला नव्हता, असाही त्यांचा आरोप आहे. मात्र, त्यावेळी आपण नव्हे तर संजय महाकाळकर गटनेते होते याकडेही तानाजी वनवे यांनी लक्ष वेधले.

Web Title: congress BJP politics tanaji vanave