esakal | कॉंग्रेस-भाजपमध्ये राडा; महापौरांच्या पतीची उपायुक्तांना ठार मारण्याची धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

कॉंग्रेस-भाजपमध्ये राडा; महापौरांच्या पतीची ठार मारण्याची धमकी

कॉंग्रेस-भाजपमध्ये राडा; महापौरांच्या पतीची ठार मारण्याची धमकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेच्या आमसभेत कॉंग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये राडा झाला. यानंतर महापौर राखी कंचर्लावार यांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी उपायुक्त विशाल वाघ यांच्या कक्षात जाऊन शिवीगाळ केली. त्यांनी ठार मारण्याची धमकी दिली. वाघ यांनी पोलिसात तक्रार केली. संजय कंचर्लावार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (Congress-Bjp-threatened-to-kill-Rada-in-the-general-assembly-Chandrapur-District-News-nad86)

मनपाच्या आमसभेत गुरुवारी प्रचंड राडा झाला. कॉंग्रेस आणि भाजपने एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार केली. आमसभा आटोपल्यानंतर महापौर राखी कंचर्लावार यांनी उपायुक्त विशाल वाघ आणि अतिरिक्त विपिन पालीवाल यांना कक्षात बोलविले. त्यावेळी महापौरांच्या कक्षात स्थायी समिती सदस्य रवी आसवानी, भाजपचे नगरसेवक देवानंद वाढई, चंद्रकला सोयाम, कल्पना बगुलकर आणि महापौरांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार उपस्थित होते.

हेही वाचा: जुळ्या बहिणींनी वयाच्या अकराव्या वर्षी उभा केला व्यवसाय

यावेळी महापौरांनी आमसभेतील राड्याच्या अनुषंगाने वाघ आणि पालीवाल यांना काही सूचना केल्या. त्यानंतर कोणतेही कारण आणि अधिकार नसताना संजय कंचर्लावार यांनी मध्येच हस्तक्षेप केला. वाघ यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. ‘तुम्ही बाहेरगावचे आहात. सांभाळून रहा. चारचौघे पाठवून कोणत्या वॉर्डात मारून फेकणार. कुणाला माहीत होणार नाही’ अशी धमकी संजय कंचर्लावार यांनी दिली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर वाघ यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंव २९४, ५०६, १८६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

(Congress-Bjp-threatened-to-kill-Rada-in-the-general-assembly-Chandrapur-District-News-nad86)

loading image
go to top