

Poll Campaign Hit as Congress Candidate Harshjit Deshmukh Suffers Health Scare
sakal
अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडींनी गाजू लागली आहे. शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर आता काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. निवडणूक तोंडावर आली असताना देशमुख यांचे अचानक आजारपण हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असून तर्कवितर्क लावण्यासोबतच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.