गडकरींच्या जन्मगावात काँग्रेस विजयी

Congress
Congress

नागपूर - जिल्ह्यातील ३८२ ग्रामपंचायतींपैकी २१८ जागांवर भाजपने दावा दावा केला असला, तरीही केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचे जन्मगाव असलेल्या धापेवाडा (ता. कळमेश्‍वर) व खासदार दत्तक ग्राम योजनेतील पाचगाव (ता. उमरेड); तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मौदा तालुक्‍यातील कवठा (म्हासला) या मूळ गावी काँग्रेस समर्थक उमेदवार विजयी झाले आहेत. 

गडकरी यांचे गाव असलेल्या धापेवाड्यात काँग्रेस समर्थक सरपंचासह सर्व १७ उमेदवार विजयी झाले आहेत. सरपंचपदाचे उमेदवार सुरेश मारुती डोंगरे यांनी १७५० मतांनी विजय मिळविला. येथील निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजीव पोद्दार, गडकरींचे समर्थक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश मानकर यांच्यावर होती. सावनेरचे आमदार सुनील केदार व जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी काँग्रेस समर्थक उमेदवारांचा प्रचार केला. या निवडणुकीत आमदार केदार यांनी गडकरी यांना गावातच चित केल्याचे स्पष्ट झाले. विजयानंतर आमदार केदार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खोट्या आश्‍वासनांचा हा परिणाम असल्याचे म्हटले आहे. नागरिकांमधील असंतोष मतदानातून व्यक्त झाल्याचे ते म्हणाले. 

उमरेड तालुक्‍यातील पाचगाव येथे सरपंचपदी काँग्रेस समर्थक उषा गंगाधर ठाकरे यांचा विजय झाला. येथे काँग्रेस समर्थक दहा; तर भाजप समर्थित एक उमेदवार निवडून आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे दत्तक गाव असलेल्या मौदा तालुक्‍यातील कवठा (म्हासला) येथे सरपंचपदी काँग्रेस समर्थित अनिता अहाके ७५० मतांनी विजयी झाल्या. येथे ११ पैकी सात जागांवर काँग्रेस समर्थक उमेदवार विजयी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com