कॉंग्रेसची मुंबईत बैठक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नागपूर : पक्षांतर्गत मुलाखती देणाऱ्या इच्छुकांमधून उमेदवारी देण्याची मागणी मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत करण्यात आली. उत्तरमधून 18 आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 25 इच्छुकांनी दावेदारी केली आहे. विशेष म्हणजे पश्‍चिम, दक्षिण आणि पूर्व नागपूरमधून एकाच उमेदवाराचे नाव सादर केल्याने वरिष्ठ नेत्यांनी नाराजीही व्यक्त केल्याचे समजते.

विधानसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक झाली. जिल्हानिहाय अध्यक्षांनी आपपल्या मतदारसंघातील अहवाल सादर केला. तत्पूर्वी जिल्हा व शहराध्यक्षांना तीन ते पाच उमेदवारांचे पॅनेल आपसात चर्चा करून तयार करण्यात सांगितले. मात्र, यावरही एकमत झाले नाही. ज्यांनी 25 हजार रुपये भरले. पक्षाच्या आदेशाचे पालन केले. मुलाखती दिल्या त्यांचा विचार आधी करावा अशी मागणी करण्यात आली. मुलाखती देणाऱ्यांपैकी काही जनाधार असलेले नगरसेवक व पदाधिकारी आहेत. त्यांची मागणी रास्त आहे. त्यांना वगळल्यास पक्षाच्या प्रक्रियेवर यापुढे कोणी विश्‍वास ठेवणार नाही असेही पटवून देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे कॉंग्रसेचे कार्याध्यक्ष नितीन राऊत, माजी मंत्री अनीस अहमद, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे आदी नेते मुलाखतीकडे फिरकलेसुद्धा नाहीत.
बैठकीला कॉंग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, निरीक्षक आशीष दुआ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक सहा विधानसभा मतदारसंघाचा अहवाल सादर केला.
पालकमंत्र्यांविरोधात कोण?
मुख्यमंत्र्यांचा दक्षिण-पश्‍चिम आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघातून एकाही दमदार उमेदवाराचे नाव देण्यात आले नसल्याने वरिष्ठ नेत्यांनी आश्‍चर्य व्यक्त केल्याचे समजते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress meets in Mumbai