कॉंग्रेसची लोकसभेची तयारी सुरू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

नागपूर - शहर कॉंग्रेस कमिटीने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, सर्व सहा विधानसभानिहाय बुथ बांधणीला प्रारंभ करण्यात आला. 

सोमवारी देवडिया भवन येथे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक घेण्यात आली. बैठकीला प्रदेश चिटणीस उमाकांत अग्निहोत्री, ऍड. अभिजित वंजारी, प्रवक्‍ते विशाल मुत्तेवार, माजी विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर, माजी नगरसेवक प्रशांत धवड, सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार, उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, रमण पैगवार, विवेक निकोसे, महिला कॉंग्रेस अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक प्रामुख्याने उपस्थित होते. 

विकास ठाकरे यांनी अभ्यासू, निर्णयक्षमता असणारा बुथ अध्यक्ष बनवण्याचा सल्ला दिला. तो किमान एका बुथमधील हजार मतदारांना परिचित असणारा व सक्रिय असावा. ब्लॉक अध्यक्षांनी बुथ अध्यक्ष बनवताना प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांना विश्‍वासात घ्यावे. एका बुथमध्ये एक बुथ प्रमुख व त्यांची 11 जणांची कार्यकारिणी येत्या 20 जूनपर्यंत द्यावी, असे निर्देशही ठाकरे यांनी दिले. एका ब्लॉक अध्यक्षाला सहा प्रमुखाची समन्वयक समितीदेखील तयार करायची आहे. संपूर्ण बुथ प्रमुखाचा मेळावा जुलै महिन्याच्या प्रारंभी घेण्यात येईल. बैठकीला ब्लॉक अध्यक्ष पंकज निघोट, वैभव काळे, प्रभाकर खापरे, निर्मला बोरकर, अनिल पांडे, प्रकाश बांते, महेश श्रीवास, प्रभाकर खापरे, इर्शाद मलिक, सूरज 

आवळे, विवेश्वर अहिरकर, दिनेश तराळे, राजकुमार कमनानी, राजेश नंदनकर तसेच नगरसेवक रमेश पुणेकर, रश्‍मी धुर्वे, नितीन साठवणे, माजी नगरसेवक वासुदेव ढोके, फिरोज खान, प्रशांत कापसे, अशोक यावले, नरेश शिरमवार, प्रकाश ठाकरे, अर्चना बडोले, इर्शाद अली, प्रसन्ना जिचकार, स्नेहल दहीकर, मिलिंद सोनटक्के आदी उपस्थित होते. 

Web Title: Congress is preparing for the Lok Sabha election