काँग्रेसला बारा जागांचा प्रस्ताव - प्रकाश आंबेडकर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

अकोला - वंचित घटकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आता कुणावरही विसंबून राहायचे नाही. त्यांचे हक्क सत्तेच्या मार्गातूनच मिळू शकतील. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीतर्फे लोकसभा निवडणुकीसाठी ओबीसी, धनगर, माळी, अनुसूचित जाती, जमाती व मुस्लिमांसाठी काँग्रेसला बारा जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर प्रतिसादाची महिनाभरापासून प्रतीक्षा करीत आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सांगितले. 

वंचित बहुजन आघाडीच्या संवाद यात्रेपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी बारामतीचे माजी आमदार विजय मोरे, आमदार बळीराम सिरस्कार, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, माजी आमदार हरिदास भदे आदींची उपस्थिती होती.  महाराष्ट्रात दोन अधिवेशने घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीची स्थापन केली असून, धर्मनिरपेक्ष विचारांसोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसला आम्ही बारा जागांचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर काँग्रेसकडून अद्याप मिळालेला नाही. भविष्यात तो न आल्यास महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांत आम्ही उमेदवार उभे करू, अशी घोषणा ॲड. आंबेडकर यांनी या वेळी केली. 

Web Title: Congress proposed twelve seats says Prakash Ambedkar