नागपूर जिल्ह्यात 10 टक्के दूषित पाणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

नागपूर  - प्रत्येकाला शुद्ध पाणी दिल्याचा प्रशासनाचा दावा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेतील तपासणीतून फोल ठरला आहे. नागपूर जिल्ह्यातील 10 टक्के पाणी दूषित असल्याचे तपासणीत आढळले. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा उद्रेक होऊ नये म्हणून दूषित पाण्यावर वेळीच उपाययोजनेसाठी ही तपासणी करण्यात येते. 

दरवर्षी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील जिल्ह्यांतील पाण्याचे नमुने तपासले जाते. यंदाही ही तपासणी करण्यात आली. राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्‍या, विहीर, हातपंप, टॅंकर आदी ठिकाणच्या पाण्याच्या स्रोतातील पाणी दूषित आढळले. राज्यात सर्वाधिक 27 टक्के दूषित पाणी वाशीममध्ये आढळले, हिंगोली 24 टक्के, तर चंद्रपूर 21 टक्के असल्याचे दिसून आले. 

दूषित पाणी पिण्यासाठी वापरल्यामुळे पटकी, कावीळ, विषमज्वर, अतिसार अशा जलजन्य साथरोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे संबंधित यंत्रणा स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबरोबर साथरोगाला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

स्वच्छ पाणीपुरवठा करण्यास असमर्थ 
नागपूर जिल्हाही दूषित पाण्यास अपवाद नाही. नागपूर जिल्ह्यातील गावांतील पाण्याचे नमुने तपासले असता 10 टक्के पाणी दूषित आढळले. प्रत्येकाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. मात्र, महानगरपालिका, नगर परिषदा असो की ग्रामपंचायत, नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यास असमर्थ असल्याचे चित्र राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या मार्च महिन्याच्या अहवालात दिसून आले. 

Web Title: contaminated water in Nagpur district nagpur news