नागरिकांनी प्रशासनाला धरले धारेवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

टेकाडी (जि. नागपूर) : नगर परिषद कन्हान पिपरीअंतर्गत काही दिवसांपासून प्रभागांमध्ये दूषित पाणी येत आहे. गुरुवारी कन्हान येथील शाळेत पाणी न आल्याने नागरिकांनी नगर परिषदेवर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. एकीकडे टॅंकरमुक्त कन्हानचा दावा करणारा सत्तापक्ष नागरिकांना शुद्ध पाणी देत नसल्याने कोट्यवधींचा निधी जातो कुठे, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

क्षेत्रात ग्रामपंचायत काळातील जीर्ण अवस्थेत असलेली पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन आहे. नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी प्रशासनाकडून नवीन पाइपलाइनचे कार्य प्रगतीवर आहे. सध्या नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचणार पाणी हे पिण्यायोग्यच नाही. गेल्या आठवड्यात प्रभाग चारमध्ये काळे गाळरहित दूषित पाणी नळाला आले. गुरुवारी शाळेत पाणीच न आल्याने नागरिकांनी नगर परिषदेवर रोष व्यक्‍त केला. तसेच सोशल मीडियावर नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरले. पाणी समस्येची माहिती मिळताच दोन दिवसांपूर्वी आमदार रेड्डी यांनी कन्हानकडे कूच करीत समस्या जाणून घेत नागरिकांना पाण्यासंदर्भात काळजी घेण्यास सांगितले. तसेच पाणीपुरवठा सभापती कोण? असे विचारताच सर्वांच्या नजरा भिरभिरल्या. सुदैवाने सभापती महोदय सेवेशी सादर नसल्याने थोडक्‍यात बचावल्याची चर्चा आहे. समस्येबाबत नगर परिषद उपाध्यक्ष मनोहर पाठक यांनी बाजू मांडत रेड्डी यांच्या प्रश्‍नाला सामोरे गेले. विरोधी पक्षनेत्या करुणा आष्टणकर यांनी कन्हान नगर परिषदेच्या विकासात सत्तापक्ष अपयशी ठरत असल्याचे सांगितले. रेड्डी यांनी परिसरात शुद्ध पाण्याचे टॅंकर पुरविण्याचे आदेश दिले होते. मात्र, आजच्या घटनेने पाणी प्रश्‍न पुन्हा चर्चेत आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: contaminated water news