सर्वांच्या सहकार्याने अधिवेशन यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नागपूर - विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशन काळात जिल्हा प्रशासन तसेच विधिमंडळ अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या समन्वयामुळे हिवाळी अधिवेशन यशस्वी झाले. अधिवेशनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व यंत्रणा व अधिकाऱ्यांनी टिमवर्क म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी केले.

विधिमंडळातील मंत्रिपरिषद सभागृहात अधिवेशनासाठी आलेल्या विधिमंडळातील सर्व अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, माहिती व जनसंपर्क विभागासह इतर विभागातील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल डॉ. अनंत कळसे यांनी सर्वांचे आभार मानले. या वेळी विधान मंडळाचे सचिव उत्तम सिंह चव्हाण, सहसचिव एम. एम. काज, एस. एस. महेकर, कुळतडकर आदी अधिकारी तसेच माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, कार्यकारी अभियंता एस. डी. इंदूरकर आदी अधिकारी उपस्थित होते.

विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी मुंबईतून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चार आठवडे मुक्काम राहतो. या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे निवास व्यवस्था तसेच आरोग्याच्या सुविधा उत्तम असल्याने कामकाजावरही त्याचा परिणाम झाला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विधानसभेच्या सभागृहाचे केलेल्या बांधकामाचे व नूतनीकरणाचे सभापती व अध्यक्षांनी विशेष कौतुक केले असून, या कालावधीत प्रशासनातर्फे उत्तम व्यवस्था करण्यात आल्याचे विधान मंडळाचे सचिव उत्तम सिंह चव्हाण यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. इंदूरकर यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधी प्रशासनातर्फे व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आवश्‍यक सुविधा तसेच व्यवस्था चोख ठेवण्यासाठी विधीमिडळ सचिवालयाचे प्रधान सचिन डॉ. अनंत कळसे, सचिव उत्तमसिंह चव्हाण, तसेच सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याने सर्वांचे आभार मानले.

Web Title: Convention in collaboration with all the success