esakal | तब्बल ३५० मच्छीमार बांधवांवर मोठं संकट; मालगुजारी तलावाला कॉर्नियाचा विळखा
sakal

बोलून बातमी शोधा

Cornia spread in malgujari lake in Rajura Chandrapur

मागील साठ वर्षापासून मच्छिंद्र मत्स्यपालन सोसायटीचे सदस्य आपला उदरनिर्वाह मत्स्यपालन व मासेमारी व्यवसायातून करीत आहेत. जवळपास साडेतीनशे कुटुंब या तलावातील मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत.

तब्बल ३५० मच्छीमार बांधवांवर मोठं संकट; मालगुजारी तलावाला कॉर्नियाचा विळखा

sakal_logo
By
आनंद चलाख

राजुरा (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील प्राचीन मालगुजारी तलाव कॉर्निया जलीय वनस्पतीच्या वेढ्यात सापडले आहे तब्बल 60 वर्षानंतर प्रथमच या तलावांमध्ये जलीय वनस्पती ने शिरकाव केल्यामुळे तलावाचे सौंदर्य लोक पावलेले आहे. शिवाय तलावात मच्छी पालन करणाऱ्या बांधवांना समोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. संपूर्ण तलावच इकॉर्निया वनस्पतीने वेढलेला असल्यामुळे मच्छी पालन व मासेमारी करण्यासाठी  मच्छीमार बांधवांना समोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. ऐतिहासिक तलावाचे सौंदर्य जपण्यासाठी नगरपरिषद व मच्छिंद्र मत्स्यपालन सोसायटीने कंबर कसलेली आहे.

मागील साठ वर्षापासून मच्छिंद्र मत्स्यपालन सोसायटीचे सदस्य आपला उदरनिर्वाह मत्स्यपालन व मासेमारी व्यवसायातून करीत आहेत. जवळपास साडेतीनशे कुटुंब या तलावातील मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र साठ वर्षाच्या कालखंडात प्रथमच जलीय वनस्पती ने तलाव झाकलेला आहे. त्यामुळे या तलावाचे सौंदर्य करण व स्वच्छता करण्याचे आवाहन नगरपालिका प्रशासनासमोर आहे. मच्छी पालन सोसायटीचे सदस्य व नगरपालिका यांच्या संयुक्त उपक्रमातून श्रमदान करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी - गाढ झोपेत असताना आला मोठा आवाज, घराबाहेर धाव घेताच दिसलं थरारक दृश्य

महाराष्ट्र शासनाच्या  पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग च्या शासन निर्णय अन्वेय संपूर्ण  राज्यात  दिनांक 2 ऑक्टोम्बर 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत   "माझी वसुंधरा" राबविण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत  पृथ्वी, जल, वायू ,अग्नी ,  आकाश या पंचत्वावर पर्यावरण विषयक मानवी  स्वभावातील बदलांसाठी  जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. 

शैक्षणिक व सामजिक  कार्यक्रमाद्वारे जनमानसात  महत्त्व पटवून देणे या अभियानाचे प्रमुख उद्धिष्ट आहे. त्या अनुषंगाने  नगरपरिषद राजुरा व मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था राजुरा  यांच्या  संयुक्त विद्यमनाने नगर परिषद  समोरील माजी मालगुजारी  तलावातील  स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आले आहे. मागील बरेच महिन्यापासून शहरातील ऐतिहासिक तलावात जलकुंभी वनस्पतीची वाढ मोठ्या प्रमाणत झाली  आहे. त्यामूळे पाण्याच्या प्रदूषणात वाढ होऊन तलावाचे नसर्गिक सोंदर्य लोप पावले आहे. 

नगर परिषद राजूरचे  नगराध्यक्ष   अरुण  धोटे ,  उपनगराध्यक्ष  सुनील देशपांडे ,  स्वच्छता व वैदयकीय समिती सभापती सौ . वज्रमला बतकमवार, तसेच सर्व समितीचे सर्व  सभापती ,  नगर सेवक याच्या सहभागातून राजुरा तलाव स्वच्छता आणि सोंदर्यीकरंन  अभियान सुरू आहे. मुख्याधिकरी  विजय कुमार सरनाईक यांचा मार्गदर्शनात सदर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगर परिषद राजुरा ने   उपलब्ध करून दिलेल्या  अभिनव मेकॅनिकल कन्व्हेअर बेल्ट च्या साह्याने तलावातील  वाढलेल्या जलपर्णी  जलकुंभी वनस्पती मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था राजुरा यांचा श्रमदानाने  काढण्यात येत आहे.

अधिक वाचा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणाचे जतन करण्यासाठी नागरिकांनी सहभाग घ्यावा. आपले शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. सर्वांच्या सहभागातून आपले शहर सुंदर होईल.
-अरुण धोटे,
नगराध्यक्ष. राजुरा

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image