कोरोनामुळे खादीचे `अच्छे दिन` गेले, विक्रीच झाली बंद, कारागिरांवर बेरोजगार होण्याची वेळ

file photo
file photo

मूल (जि. चंद्रपूर) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे येथील खादी ग्रामोद्योग संघ आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादित मालाची विक्री पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने संस्थेला आर्थिक चणचण निर्माण झाली आहे.

वार्षिक कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या संस्थेत आता लाखोचांच व्यवहार सुरू आहे. गांधी जयंतीपासून देण्यात येणाऱ्या खादी वस्तूंच्या खरेदीवरदेखील यंदा प्रथमच कात्री लावण्यात आली आहे.

फक्त दोनच दिवस विशेष सवलत देण्यात आली. राज्य आणि केंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेतून ग्रामोद्योग संघाला मदत करावी, अशी मागणी आता होत आहे. येथे काम करणाऱ्या कारागिरांवरही बेरोजगारीचे संकट ओढवू पाहत आहे.

मूलमध्ये १९५८ मध्ये नाग विदर्भ चरखा संघाची स्थापना

गांधी विचारांनी प्रेरित होऊन मूलमध्ये १९५८ मध्ये नाग विदर्भ चरखा संघाची स्थापना करण्यात आली. कताई, विणाई, कापड्याला रंगरंगोटी आदी काम मूलमध्ये चालायचे. आजतागायत चरखा संघ सुरू असले; तरी चरखा संघाच्या माध्यमातून घरोघरी सूतकताई सुरू आहे. पंचवीस घरांमध्ये हे काम महिलावर्ग करतात. यातून त्यांना रोजगार मिळाला. तयार झालेली सूत गुंडी नागपूर, कामठी येथे पाठविली जाते. याठिकाणीसुद्धा घरोघरी विणाईचे काम केले जाते.

चार ते पाच महिने विक्री बंद

कोरोना काळात उत्पादित झालेल्या वस्तूंची विक्रीच थांबल्याने चरखा संघाला मोठा फटका बसला. चार ते पाच महिने विक्री केंद्र बंद होते. त्यामुळे खादी उत्पादित वस्तूंवर चांगलाच परिणाम झाला. उत्पादित मालाची विक्री थांबल्याने शासनाचे पाहिजे तसे अनुदान संस्थेला मिळाले नाही. त्यामुळे संस्थेंअंतर्गत काम करणाऱ्या कारागिरांवर आज बेरोजगार होण्याची पाळी आल्याची माहिती आहे.

गांधी जयंतीचे औचित्य साधून एक आणि दोन ऑक्‍टोबरला विशेष सवलत देण्यात आली. या दोन दिवसांत विक्री केंद्रातून फक्त लाख रुपयांच्या मालाची विक्री झाली. मूल येथील खादी भांडारमध्ये फक्त ४१ हजार रपयांची विक्री झाली.

चरखा संघ संकटात
कोरोनामुळे नाग विदर्भ चरखा संघाला मोठा आर्थिक फटका बसला. संस्थेकडे पैसा नाही. शासनाचे अनुदान मिळाले नाही. चरखा संघ संकटात सापडला आहे. त्यामुळे आम्ही गांधी जयंतीला फक्त दोनच दिवस वीस टक्‍के सवलत ठेवली होती. संस्थेला आर्थिक मदतीची गरज असल्याने महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने आत्मनिर्भर योजनेतून संस्थेला मदत करावी.
बंडू भडके, सचिव ,नाग विदर्भ चरखा संघ मूल.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com