esakal | पाडव्याच्या मुहूर्तावर टपलाय ‘कोरोना’; वाचा कसा राहिल व्यापारी क्षेत्रावर परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

commercial sector.JPG

घर खरेदी असो वा नवीन वाहन घरी आणायचे असो, सोने खरेदीपासून घरात दैनंदिन लागणाऱ्या छोट्या-छोट्या यंत्रांची, वस्तुंची खेरीद करण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला जातो.

पाडव्याच्या मुहूर्तावर टपलाय ‘कोरोना’; वाचा कसा राहिल व्यापारी क्षेत्रावर परिणाम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : गुढीपाडवा अर्थात हिंदू संस्कृतीप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. हा मुहूर्त साधत अनेक नागरिक गृह खरेदीपासून नवीन वस्तू खरेदीवर भर देतात. त्यामुळे बाजारत पाडव्याच्या मुहूर्ताला मोठी उलाढाल होते. त्यावर्षी मात्र पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोरोना विषाणूचे सावट राहणार आहे. त्यामुळे व्यापारी चिंतेत आहे. विविध 250 क्षेत्रांवर त्याचा परिणाम दिसून येणार आहे.

घर खरेदी असो वा नवीन वाहन घरी आणायचे असो, सोने खरेदीपासून घरात दैनंदिन लागणाऱ्या छोट्या-छोट्या यंत्रांची, वस्तुंची खेरीद करण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला जातो. त्यामुळे या मुहूर्ताला बाजारात मोठी चहलपहल असते. गत तीन वर्षांपूर्वीच्या नोटबंदीतून अद्यापही बाजार सावरलेला नाही. त्यामुळे विशिष्ट मुहूर्तावर होणारी खरेदी ही व्यापाऱ्यांसाठी संधी असते. त्या विशिष्ट मुहूर्तांपैकी एक म्हणजेच गुढीपाडवा. येत्या बुधवारी, 25 मार्चला हा मुहूर्त साधण्यासाठी व्यापाऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. नागरिकांनीही खरेदीचे अनेक बेत तयार करून पाडव्याच्या खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी तयारी केली. 

हेही वाचा - COVID2019 : जनता कर्फ्यूदरम्यान हे डॉक्टर देताय घरपोच वैद्यकीय सेवा

मात्र त्यापूर्वीच सर्वत्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची धास्ती पसरली आहे. प्रशासनाकडून गर्दी टाळण्यासाठी बाजारापेठांच्या वेळा मर्यादित केल्या आहेत. व्यापाऱ्यांनीही स्वतःसह दुकानातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेतच प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू झाली आहे. अशात पाडव्याला होणारी बाजारातील गर्दी बघता नागरिक ही खरेदीचा मोह टाळण्याची शक्यता आहे. परिणामी पाडव्याच्या उलाढालीवर त्याचा मोठा परिणाम होऊन व्यापाऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.

या क्षेत्रावर पडणार परिणाम

  • गृह खरेदी : पाडव्याच्या मुहूर्तावर घर खरेदी होते. कोरोनामुळेही या क्षेत्रावर परिणाम दिसून येत असल्याने विकासकांनी शासनाकडे आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच काही सवलती जाहीर करम्याची मागणी केली आहे. त्यात चटई क्षेत्रासाठी भरावी लागणारी रक्कम, रेडीरेकनरचे दर कमी करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.
  • संगणक, मोबाईल : पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर डेक्सटॉप, लॅपटॉप, टॅप व मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असते. कोरोनामुळे या क्षेत्रावरही त्याचा परिणाम दिसून येणार आहे.
  • सराफा : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीवर ग्राहकांचा भर असतो. नववर्षाचे स्वागत करताना होणारी खरेदी यावर्षी कोरोनामुळे बाधिक होणार आहे.
  • कापड : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नवीव कपडे खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. यावर्षी मात्र नवी कपडे खरेदी करण्याचा उत्साह कमी दिसून येत आहे.
  • इलेक्ट्रॉनिक्स : टीव्ही, मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी पाडव्याचा मुहूर्त साधला जातो. यावर्षी मात्र कोरोनाचा परिणाम या क्षेत्रावरही दिसून येणार आहे.