esakal | मेळघाट बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; जिल्हापरिषदेकडून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

मेळघाट बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; जिल्हापरिषदेकडून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

मेळघाट बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; जिल्हापरिषदेकडून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : एकीकडे शहरी भागात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असतानाच मागील अनेक दिवस कोरोनापासून दूर असलेल्या मेळघाटला कोरोनाने विळखा घातला आहे. सध्याची रुग्णवाढ पाहता मेळघाटची वाटचाल कोरोनाच्या हॉटस्पॉटकडे वेगाने होताना दिसून येत आहे. मेळघाटसह ग्रामीण भागात कोरोनाच्या नियंत्रणासाठी आता जिल्हापरिषदेकडून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा: के.टी. नगर येथे मनपाचे १०० खाटांचे कोव्हिड रुग्णालय सुरू; सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना होणार लाभ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) प्रशांत थोरात यांना चिखलदरा, धारणी, अचलपूर, अंजनगावसुर्जी, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) तुकाराम टेकाळे यांच्याकडे मोर्शी, वरुड, चांदूरबाजार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) प्रवीण सिनारे यांच्याकडे तिवसा, धामणगावरेल्वे, चांदूररेल्वे तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे यांची दर्यापूर, अमरावती, नांदगावखंडेश्‍वर येथे, तर भातकुली तालुक्‍याचे नोडल अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्‍यांत पंडा यांची नियुक्ती केली आहे.

नागरिकांमध्ये कोविडबाबत जनजागृती करणे, विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी घ्यावयाची खबरदारी, रुग्णाच्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग करून नमुना चाचणी घेणे, तपासणीचे अहवाल तातडीने पाठवून औषधोपचाराची मदत करणे, कोविड रुग्णालयातील सेवासुविधा, गृहविलगीकरणातील रुग्णांकडून नियमावलीचे पालन होते किंवा नाही हे पाहणे आदीबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा: वरिष्ठ डॉक्टरकडून महिला डॉक्टरला शारीरिक सुखाची मागणी; मेडिकेअर हॉस्पिटलमधील घटना

मेळघाट, वरुडवर 'फोकस'

जिल्ह्यातील मेळघाट तसेच वरुड या भागांमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. जिल्हास्तरीय यंत्रणेशी वेळोवेळी संपर्क तसेच समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्‍यांत पंडा यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image
go to top