esakal | वरिष्ठ डॉक्टरकडून महिला डॉक्टरला शारीरिक सुखाची मागणी; मेडिकेअर हॉस्पिटलमधील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

वरिष्ठ डॉक्टरकडून महिला डॉक्टरला शारीरिक सुखाची मागणी; मेडिकेअर हॉस्पिटलमधील घटना

वरिष्ठ डॉक्टरकडून महिला डॉक्टरला शारीरिक सुखाची मागणी; मेडिकेअर हॉस्पिटलमधील घटना

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : कोविड रूग्णालयात सेवा देणाऱ्या एका महिला डॉक्टरला सिनिअर डॉक्टरने शारीरिक सुखाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्यावर हॉस्पिटलमध्येच बळजबरी करीत अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना कोराडी मार्गावरील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली आहे. डॉ. नंदु रहांगडाले (वय ३९ रा. ट्रस्ट ले-आउट , हिलटॉप, अंबाझरी) असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे.

हेही वाचा: धक्कादायक! मद्यपींना दारू मिळेना; चक्क घेतात सॅनिटायझरचा घोट; चार दिवसात 7 जणांचा मृत्यू

मेडिकेअर हॉस्पिटल कोव्हिड केअर सेंटर आहे. पीडित २४ वर्षीय महिला डॉक्टर काही दिवसांपूर्वी मेडिकेअरमध्ये कामाला लागली. तेव्हापासून नंदु याची वाईटनजर तिच्यावर होती. सोमवारी रात्री महिला डॉक्टर खोलीत असताना नंदु तेथे आला आणि महिला डॉक्टरला शारीरिक सुखाची मागणी केली. महिला डॉक्टरने नकार दिला.

त्यानंतर नंदु याने अश्लील चाळे करून अत्याचाराचा प्रयत्न केला. डॉक्टरला धक्का देत महिला बाहेर आली तडक मानकापूर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नंदु याला अटक केली.

हेही वाचा: अमरावतीकरांनो सावधान! रस्त्यांवर फिरतोय कोरोना व्हायरस; नियमांचं पालन कराच; अन्यथा...

आठवड्यातील दुसरी घटना

यापूर्वी अजनी परिसरातील अनुग्रह हेल्थ केअर सेंटर ॲण्ड ओल्ड एज होम फिजिओ व नॅचरोपॅथी सेंटरमध्ये डॉक्टर सुनील वर्गिस (वय ४०) याने हॉस्पिटलमध्येच १९ वर्षीय परिचारिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. एक आठवड्यातील डॉक्टरने अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या दोन घटना घडल्या.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image