esakal | के.टी. नगर येथे मनपाचे १०० खाटांचे कोव्हिड रुग्णालय सुरू; सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना होणार लाभ
sakal

बोलून बातमी शोधा

के.टी. नगर येथे मनपाचे १०० खाटांचे कोव्हिड रुग्णालय सुरू; सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना होणार लाभ

के.टी. नगर येथे मनपाचे १०० खाटांचे कोव्हिड रुग्णालय सुरू; सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना होणार लाभ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे संचालित के.टी.नगर रुग्णालय येथे १०० खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उदघाटन केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेन्द्र फडणवीस व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. त्यामुळे बेडससाठी भटकणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा: अमरावतीकरांनो सावधान! रस्त्यांवर फिरतोय कोरोना व्हायरस; नियमांचं पालन कराच; अन्यथा...

के.टी.नगर येथे कोविड रुग्णालय सुरु करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होता. महापौर दयाशंकर तिवारी, आमदार विकास ठाकरे, नगरसेवक हरीश ग्वालबंशी व नगरसेवक विक्रम ग्वालबंशी यांनी स्थानिक नागरिकांची समजूत घातली. रुग्णालय सुरू करण्याची निकड समजावून सांगितले. रुग्णालयाची इमारत मनपाची आहे तसेच डॉक्टर्स, नर्सेस व अन्य स्टाफची व्यवस्थासुध्दा मनपा मार्फत करण्यात आली आहे. जेवनाची, औषधी व अन्य सुविधा मनपातर्फे नि:शुल्क करण्यात आली आहे. रुग्णालयाचे संचालनाची व्यवस्था रमेश फुके (पाटिल) चॅरिटेबल ट्रस्टकडे देण्यात आली आहे. आमदार डॉ. परिणय फुके व त्यांचे सहकारी संचालनात मदत करणार आहेत.

नितीन गडकरी यांनी कोविड रुग्णांना अधिकाधिक सोयी उपलब्ध व्हाव्या म्हणून अनेक सामाजिक संस्था आपली सेवा देत आहेत, मनपा व फुके यांनी एक चांगले कार्य हाती घेऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा महापालिका आणि रमेश फुके चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले.

हेही वाचा: धक्कादायक! मद्यपींना दारू मिळेना; चक्क घेतात सॅनिटायझरचा घोट; चार दिवसात 7 जणांचा मृत्यू

यांना दाखल करून घेणार

या 'कोविड सेंटरवर' पॉझिटिव्ह आणि सौम्य लक्षणे आहेत, ज्यांचा सीटी स्कॅन स्कोअर आठच्या खाली खाली असेल तसेच ऑक्सिजन लेव्हल ९२ पेक्षा वर असेल त्यांनाच दाखल करुन घेतले जाणार आहे. कोव्हीड केअर सेंटरचा लाभ घेण्यासाठी ९०२१३३६०३७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image
go to top