esakal | रोजगार गेला; पण सुरू केला खेळण्यांचा व्यवसाय; संकटावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

Business : रोजगार गेला; पण सुरू केला खेळण्यांचा व्यवसाय

Business : रोजगार गेला; पण सुरू केला खेळण्यांचा व्यवसाय

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : मुंबईत सुरू असलेले काम कोरोनामुळे बंद झाले. आता पुढे काय करावे? लॉकडाऊनचा काळ असल्याने कुठे दुसऱ्या ठिकाणीसुद्धा काही सोय उरली नाही, अशा स्थितीत न डगमगता मेळघाटामधील दोन उच्चशिक्षित तरुणांनी स्वगृही परतून लाकडी खेळणी बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. केवळ व्यवसाय सुरू केला नाही तर या भागातील काही बेरोजगारांनासुद्धा काम उपलब्ध करून दिले. (Corona-Jobless-Start-Business-Youth-Story-nad86)

तोरणावाडी येथील अनिल धुर्वे व बोराळा येथील विश्वनाथ दहीकर अशी या हरहुन्नरी उच्चशिक्षित तरुणांची नावे. त्यासोबतच निखिल मानकर व ‘खोज’ संस्थेचे अ‍ॅड. बंडू साने आदी सदस्य मिळून त्यांनी ग्रुप तयार केला आहे. यापैकी अनिल धुर्वे यांनी मुंबईच्या रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये तर विश्वनाथ दहीकर यांनी जे. जे. स्कूल ऑफ ऑर्ट्समधून शिक्षण घेतले. मुंबईला एका कंपनीत दोघांचीही चांगली नोकरी सुरू असतानाच अचानक आलेल्या कोरोनाने दोघांचाही रोजगार हिरावून घेतला.

हेही वाचा: सत्तांतरानंतर प्रश्न रखडला; पाच एव्हरेस्टवीर नोकरीच्या प्रतीक्षेत

मार्च-एप्रिलमध्ये त्यांनी थेट आपले गाव गाठले. येथे त्यांनी अ‍ॅड. बंडू साने व इतरांच्या सहकार्यातून प्लायवूडपासून खेळणी बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अनिल धुर्वे यांनी डिझाइन बनविण्यास सुरुवात केली तर विश्वनाथ दहीकर व किरण मानकर यांच्याकडे प्लायवूडला आकार देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.

डिझाइनसाठी आवश्यक दोन संगणक बंडू साने यांनी उपलब्ध करून दिले आणि या संगणकावरच आता सध्या लाकडी खेळण्यांचे डिझाइन्स तयार केले जातात. मेळघाटसह अचलपूर, अमरावती तसेच धारणीलगतच मध्य प्रदेश सीमेतील काही ठिकाणी या खेळण्यांची विक्री केली जाते. सध्या थोड्याफार प्रमाणात जरी सुरुवात असली तरी हा व्यवसाय आता अधिक विस्तारित करण्याचा निर्णय या गटाने घेतला आहे.

हेही वाचा: ...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

गुणवत्तेचा वापर उदरनिर्वाहासाठी

आता शाळा सुरू झाल्या असल्या तरी ज्यावेळी एप्रिल तसेच मे महिन्यात हा व्यवसाय सुरू केला, त्यावेळी शाळा बंद होत्या. विद्यार्थी व पालक घरीच होते. त्यामुळे मोबाईलचे प्रमाण अधिकच वाढले. मुलांमध्ये पारंपरिक खेळांप्रती रुची निर्माण करण्यासाठी या तरुणांनी खेळणी बनविण्याचा व्यवसाय निवडला. आपल्यातील कौशल्यांचा वापर उदरनिर्वाहासाठी सुद्धा होऊ शकतो, हेच या तरुणांनी दाखवून दिले आहे.

(Corona-Jobless-Start-Business-Youth-Story-nad86)

loading image