esakal | अमरावतीत दोन कोविड सेंटर बंद, कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं कारण तरी काय?
sakal

बोलून बातमी शोधा

corona patients decreases in amravati

कोरोनाबाधितांसाठी जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात १३४५ खाटा तयार करण्यात आल्या होत्या. त्यापैकी आता १०४५ खाटा रिक्त आहेत. प्रशासकीय माहितीनुसार, मोझरी आणि मोर्शी कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही.

अमरावतीत दोन कोविड सेंटर बंद, कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं कारण तरी काय?

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता दोन कोविड सेंटर सुद्धा बंद करण्यात आले आहे. ही दिलासा देणारी बाब असून १०४५  खाटा सुद्धा रिक्त आहेत. 

हेही वाचा - महसूलमंत्री थोरात म्हणाले, कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात असून प्रलंबित महसुली कामांना गती द्या

कोरोनाबाधितांसाठी जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात १३४५ खाटा तयार करण्यात आल्या होत्या. त्यापैकी आता १०४५ खाटा रिक्त आहेत. प्रशासकीय माहितीनुसार, मोझरी आणि मोर्शी कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही. पीडीएमसीमध्ये १२, सुपरस्पेशलिटीमध्ये १३२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. शहरातील खासगी कोविड सेंटरमध्ये उपलब्ध ५१५ पैकी ४२५ खाटा सध्या रिक्त आहेत. एकूणच ७८ टक्के खाटा सध्या रिक्त आहे. शहरातील दोन कोविड सेंटर बंद झाले असून आणखी दोन खासगी कोविड सेंटर संचालकांकडून बंद करण्याबाबत प्रशासनाला पत्र देण्यात आल्याची माहिती आहे. 

हेही वाचा - भाजपमध्ये खळबळ; झोन सभापतींच्या पतीचा ऑडिओ क्लिप व्हायरल, ‘काम झाले हिशेब कधी करतो’

अशी आहे रिक्त खाटांची संख्या -
सुपर स्पेशालिटी १६८, पीडीएमसी २०२, दयासागर रुग्णालय ३९, बेस्ट हॉस्पिटल २५, बख्तार हॉस्पिटल २५, झेनिथ हॉस्पिटल ८५, डॉ. गोडे हॉस्पिटल ८८, अंबादेवी हॉस्पिटल ५२, एक्‍झॉन ८७, याशिवाय कोविड हेल्थसेंटरचा विचार करता  अचलपूर ५५, ट्रामा केअर नांदगाव ४६, डॉ. ढोले हॉस्पिटल५७, मोझरी१००, मोर्शी येथे २० खाटा रिक्त आहेत. 

रिकव्हरी रेट ९३ टक्‍क्‍यावर -
दिलासा देणारी बाब अशी की ज्या प्रमाणे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे, त्याच प्रमाणात  रिकव्हरी रेट सुद्धा वाढून ९३ टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. शिवाय रुग्ण दुप्पटीचा कालावधी सुद्धा १५० दिवसांवर आला आहे. 

loading image