esakal | मारेगाव येथील कोविड केअर सेंटरमधून कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती गायब; महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून शोध सुरू..
sakal

बोलून बातमी शोधा

Corona positive patient missing from covid care center in yavatmal

येथील कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेला कोरोनाचा पॉझिटिव्ह व्यक्ती आज (ता. २९) च्या पहाटे चारदरम्यान अचानक निघून गेला. सकाळी साडेसात वाजता प्रशासनाला ही बाब कळताच एकच खळबळ उडाली.

मारेगाव येथील कोविड केअर सेंटरमधून कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती गायब; महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून शोध सुरू..

sakal_logo
By
सुमित हेपट/कैलास ठेंगणे

मारेगाव (जि. यवतमाळ): यवतमाळ जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. वारंवार प्रशासनाला लॉकडाउन करण्याची वेळ येत आहे. मात्र नागरिकांना अजूनही या गंभीर आजाराचे गांभीर्य काळात नाहीये. सतत सूचना देऊनही येथील नागरिक प्रशासनाच्या नियमाचे उल्लंघन करत आहेत. त्यात जिल्ह्यातील मारेगाव येथे गंभीर घटना घडली आहे. 

मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने त्याच्यासह त्याच्या संपर्कातील 36 व्यक्ती विलगिकरणात ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी येथील स्वर्गीय चिंधुजी पुरके आश्रमशाळेत कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेन्टरमध्येच कुंभा येथील व्यक्तीला ठेवण्यात आले होते. मात्र कोरोनाचे सर्व नियम तोडून एका व्यक्तीने पळ  काढला आहे. 

हेही वाचा - घरात सापडलेली तांब्याची वस्तू निघाली तब्बल 1500 वर्ष जुनी; इतिहास बघितला आणि सर्वांनाच बसला धक्का..

पहाटेच्या सुमारास झाला गायब 

येथील कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेला कोरोनाचा पॉझिटिव्ह व्यक्ती आज (ता. २९) च्या पहाटे चारदरम्यान अचानक निघून गेला. सकाळी साडेसात वाजता प्रशासनाला ही बाब कळताच एकच खळबळ उडाली. सदर व्यक्ती या सेन्टरमधून आज पहाटे चारदरम्यान निघून गेल्याचे प्रशासन सांगत आहे. ही बाब महसूल प्रशासनाला माहिती होताच पोलिस विभागाला कळविण्यात आले आहे. 

पोलिस घेत आहेत शोध 

अजूनपर्यंत या व्यक्ती गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये. पोलिस सदर व्यक्तीचा शोध घेत आहेत. कोरोनाचा सामान्य लक्षणे असल्याने व त्याला व्हेनटीलेटरची गरज नसल्याने सदर व्यक्तीवर येथेच उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोना पॉझिटीव्ह व्यक्ती पळून गेल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

जाणून घ्या - विद्यार्थ्यांनो व्हा सज्ज! चार ऑगस्टपासून होणार तुमच्या शाळा सुरू...

व्यक्तीचा सर्वत्र शोध सुरु आहे 
''कोरोनाचा पॉझिटीव्ह व्यक्ती मारेगाव येथील कोविड केअर सेन्टरमधून 29 जुलैच्या पहाटे निघून गेला. सदर बाब महसूल व पोलिस प्रशासनास कळविण्यात आली आहे. पोलिस त्या व्यक्तीचा सर्वत्र शोध घेत आहे."
-डॉ. अर्चना देठे,
तालुका आरोग्य अधिकारी,मारेगाव.

संपादन - अथर्व महांकाळ