Corona Positive Report Buldana akola High
Corona Positive Report Buldana akola High

कोरोना पॉझिटिव्ह अहवालाचा बुलडाण्यात उच्चांक

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी काल रात्री व आज असे एकूण 133 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 105 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 28 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. तसेच आजपासून रॅपीड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे कोरोना निदान करणे सुरू करण्यात आले आहे. या टेस्टच्या माध्यमातून आज 91 अहवाल प्राप्त झाले आहे. त्यामध्ये 76 निगेटीव्ह व 15 पॉझीटीव्ह अहवाल आहेत. अशाप्रकारे प्रयोगशाळेतून व रॅपीड टेस्टद्वारे एकूण 224 अहवाल प्राप्त झाले आहेत. यामधून एकूण 181 निगेटीव्ह अहवाल प्राप्त असून 43 अहवाल पॉझीटीव्ह आहेत.


प्रयोगशाळेतून प्राप्त पॉझीटीव्ह अहवालामध्ये दाल फैल खामगाव येथील 35 व 26 वर्षीय पुरूष, वाडी खामगांव येथील 22 व 50 वर्षीय महिला, सती फैल खामगांव येथील 38 वर्षीय पुरूष, 75, 85 व 50 वर्षीय महिला, नांदुरा येथील 45 वर्षीय पुरूष, सिव्हील लाईन खामगांव येथील 45 वर्षीय पुरूष, हिवरखेड ता. खामगांव येथील 55 वर्षीय महिला, टिळक मैदान खामगांव येथील 45 वर्षीय पुरूष, गारखेडा ता. सिं.राजा येथील 38 वर्षीय पुरूष, 17 वर्षीय तरूणी, 15 वर्षीय मुलगा, वर्दळी ता. सिं.राजा येथील 32 वर्षीय पुरूष, मेहकर येथील 15 वर्षीय दोन तरूणी, 9 वर्षीय मुलगा, दुर्गापुरा दे.राजा येथील 78 व 50 वर्षीय पुरूष, 13 व 48 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, डिएसडी मॉल बुलडाणा येथील 44 वर्षीय पुरूष, मलकापूर येथील 40 वर्षीय पुरूष, बुलडाणा येथील 51 वर्षीय पुरूष, नांदुरा येथील 9 वर्षीय मुलगा अशाप्रकारे जिल्ह्यात प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालामध्ये 28 रूग्ण पॉझीटीव्ह आढळले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
त्याचप्रमाणे रॅपिड टेस्ट किटद्वारे प्राप्त पॉझीटीव्ह अहवालामध्ये शेगांव येथील 65 वर्षीय महिला, जमजम नगर शेगांव येथील 71 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय तरूण, 40 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महिला, 6 वर्षीय मुलगी, 36 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, आरोग्य कॉलनी शेगांव येथील 69 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय पुरूष, मेहकर येथील 64 वर्षीय पुरूष, चिखली येथील 55 वर्षीय महिला, डिएसडी मॉल बुलडाणा येथील 37 वर्षीय महिला, नांदुरा येथील 55 व 23 वर्षीय पुरूष संशयीत व्यक्तीचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. अशाप्रकारे रॅपिड टेस्टमधून 15 अहवाल पॉझीटीव्ह आहेत.


तसेच आज 11 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये सुलतानपूर ता. लोणार येथील 55 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरूष, साखरखेर्डा ता. सिं.राजा येथील 48 वर्षीय पुरूष, सरंबा ता .दे.राजा येथील 49 वर्षीय पुरूष, मूळ पत्ता रेलूम ता. अकोट येथील व सध्या बुलडाणा येथे असलेले 65 वर्षीय पुरूष, बुलडाणा येथील 19 वर्षीय दोन तरूण, माळवंडी ता. बुलडाणा येथील 40 वर्षीय पुरूष, बस स्थानक परीसर खामगांव येथील 40 वर्षीय पुरूष, 14 वर्षीय मुलगा आणि कॉंग्रेस नगर शेगांव येथील 19 वर्षीय तरूणीचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत प्रयोगशाळेतून व रॅपिड टेसटद्वारे 3287 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 201 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 201 आहे. आज रोजी 271 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 3287 आहेत.


जिल्ह्यात आजअखेर एकूण 343 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 201 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात प्रयोशाळेतून प्राप्त पॉझीटीव्ह अहवालातील 114 व रॅपिड टेस्ट किटमधील 15 अशाप्रकारे 129 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 13 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
 

देऊळगावराजात खळबळ
येथील सोनोग्राफी सेंटरमध्ये कामाला असलेल्या महिला रुग्णाच्या कुटुंबातील तब्बल पाच जणांना संसर्ग झाल्याचा धक्कादायक अहवाल आज (ता.7) आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून तालुक्‍यात कोरोना संसर्गीत ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या आता नऊ झाली आहे एका दिवसात पहिल्यांदाच पाच रुग्ण पॉझिटिव ठरल्याने प्रशासन हादरले असून तालुक्‍यात खळबळ उडाली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com