esakal | अकोलेकरांनो घाबरू नका, तो कोरोनाचा संशयीत रुग्ण केवळ...
sakal

बोलून बातमी शोधा

corona .jpg

रुग्णाचे रक्त नमुने आणि एक्सरे दोन्ही नार्मल आहेत. मात्र, श्‍वासाचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.

अकोलेकरांनो घाबरू नका, तो कोरोनाचा संशयीत रुग्ण केवळ...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : अकोल्यात कोरोनाचा प्रवेश!, ही केवळ अफवा असून, भारतीय वैद्यकीय निकषानुसार, आंतरराष्ट्रीय प्रवास करून देशात येणाऱ्यांच्या काही प्राथमिक तपासण्या कराव्या लागतात. त्याच प्राथमिक तपासण्या जर्मनीवरून परतलेल्या 24 वर्षीय रुग्णांच्या करण्यात आल्या आहेत. त्या तपासण्या नॉर्मल निघाल्या असून, कोणीही सोशल मीडियावर उलट-सुलट अफवा पसरवू नये असे आवाहन सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

जगभरात कहर घातलेल्या कोरोना व्हायरसचा पहिला संशयीत रुग्ण अकोल्यातही आढळल्याचे वृत्त वाऱ्यासारखे जिल्ह्यासह राज्यभर पसरले. या रुग्णांच्या सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वार्डात प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या असून, रुग्णाचे रक्त नमुने आणि एक्सरे दोन्ही नार्मल आहेत. मात्र, श्‍वासाचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. तो वैद्यकीय अहवाल सोमवारी प्राप्त होणार असून, त्या अहवालाची प्रतीक्षा आहे. 

हेही वाचा - आश्‍चर्यम! घोडीने दिला गाढवाला जन्म

मुळ अकोल्यातील रहिवासी असलेली 24 वर्षीय तरुणी जर्मनीला नोकरीसाठी गेली होती. 1 मार्च रोजी ती जर्मनीवरून पुणे विमानतळावर उतरली. तर अकोल्यात 5 मार्च रोजी दाखल झाली. अकोल्यात आल्यावर तरुणीला ताप येण्यास सुरुवात झाली. प्रकृती खालावत असल्याने आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना? असा संशय आल्याने शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास तरुणीने थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वार्डात धाव घेतली.

श्‍वासाच्या नमुन्याची प्रतीक्षाच
कोरोना आयसोलेशन वार्डात दाखल होताच रुग्णाच्या घशातील श्वासाचे नमुने घेण्यात आले. हे नमुने तपासणीसाठी तत्काळ पुण्याला पाठविण्यात आले आहेत. नमुन्यांचा तपासणी अहवाल येण्यास दोन दिवसांचा अवधी लागणार आहे.

अफवा पसरवून नागरिकांची दीशाभूल करू नये
कोरोना व्हायरस संदर्भात भारत सरकारने दिलेल्या निर्देशानुसार जर्मनीहून परतलेली तरुणी संशयित नसून, तिच्यावर पाळण ठेवण्यासाठी तिला आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहे. यासंदर्भात अफवा पसरवून नागरिकांची दीशाभूल करू नये.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

loading image