एका कोरोनाने एवढा अनर्थ केला

टीम ई सकाळ 
Sunday, 11 October 2020

संसर्गजन्य कोरोनाने आपले रौद्ररूप दाखवणे सुरू केले. भीती, शंका, लक्षणे या सर्वांनीच माणसाला वेढले. सर्वसामान्य परंपरागत चालत आलेली लक्षणे व उपचार यापुढे फोल ठरू लागले. जनमानसात खळबळ माजली. सामान्यतः घरातील ज्येष्ठ मंडळींसाठी हा साधा फ्लू किंवा सिझनल चेंजेस असा समज होता, परंतु हा समज  केव्हाच मोडकळीस आला, जेव्हा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह निघण्यास सुरुवात झाली.

नागपूर  : एक थाटामाटात वसलेलं नागपूर नावाचं शहर होतं. सगळे कसे गुण्यागोविंदाने नांदत, एकमेकांना भेटी देत, Get-together करीत एन्जॉय करायचे. कडकडून मिठी मारल्याशिवाय नागपूरकरांना तर चैनच पडत नाही. हॉटेल्स ,धाबे, लॉंग ड्राईव्ह, मिरवणूक, मारबत, शॉपिंगमध्ये मी म्हणून नेहमी समोर. तर्री पोह्यावर, सावजी मटणावर ताव मारीत, राजकारणावर मस्त चर्चा करीत, अबे काबे म्हणत म्हणत घरी परतायचं.

जगी सर्व सुखी असा कोण आहे! विचारी मना तुच शोधूनी पाहे! सुख म्हणजे नक्की काय असतं? अतिशय चंगळीत राहणाऱ्या नागपूरकरांवर मात्र एके दिवशी कपटी रावणाने घाला घातला. राम युग यायला कलियुगातला प्रत्येक क्षण हा कलीने धुमाकूळ घातलेलाच असावा असा. माणुसकी हादरली. मनुष्य प्रेमाला पारखा  झाला. तर हा covid-19 नावाच्या मारीच्याने आघात केला होता.

संसर्गजन्य कोरोनाने आपले रौद्ररूप दाखवणे सुरू केले. भीती, शंका, लक्षणे या सर्वांनीच माणसाला वेढले. सर्वसामान्य परंपरागत चालत आलेली लक्षणे व उपचार यापुढे फोल ठरू लागले. जनमानसात खळबळ माजली. सामान्यतः घरातील ज्येष्ठ मंडळींसाठी हा साधा फ्लू किंवा सिझनल चेंजेस असा समज होता, परंतु हा समज  केव्हाच मोडकळीस आला, जेव्हा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह निघण्यास सुरुवात झाली.

ठळक बातमी - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला
 

साधारणतः सर्दी, ताप, खोकला, कफ, भूक न लागणे, डायरिया, शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, तोंडाची चव व वास जाणे, एवढेच काय ते मापदंड होते आणि ते अतिशय ताकदीने व सर्व घरगुती उपचार करून बरे होण्यासारखे होते, परंतु आता हीच लक्षणे मात्र जीवावर उठली होती. यातच मग सोशल मीडियाच्या अपप्रचाराने भरच पडली. शे दोनशे औषधी, वेगवेगळ्या पद्धतीचे रंगीबिरंगी काढे,  Sanitizers आणि एक नवा दागिना म्हणजे मास्क, यांची तर चलतीच वाढली.

आणि अशातच नियम लागू झाला Lockdown चा, म्हणजे टाळेबंदी .अशात सर्व सार्वजनिक संस्था ,मॉल्स, दुकाने, व्यायामशाळा, बसेस, रेल्वे, शाळा-कॉलेज, पूल एकाएकी बंद झाले, एवढेच काय तर देवळे सुद्धा सुटली नाही. देवदर्शनाची बंदी करावी तर संकटात देवाला कसं काय साकड घालणार? सर्वत्र हाहा:कार पसरला होता आणि अचानक या टाळेबंदी च्या नियमाने तर स्मशान शांतताच पसरली.

टाळेबंदी मुळे मात्र कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र 24*7 राहू लागले. मग काय सुरुवातीला दोन-तीन महिने या सुखाने सर्व घरात का होईना पण आनंदात दिवस दाखवले. मग काय सासू-सुनेची आपसात दोस्ती झाली, वेगवेगळ्या चमचमीत पदार्थ ना तर नुसता ऊतच आला होता. जुने खेळ, आजीच्या गोष्टी, अनुभव या सर्वांनी Lockdown ने हा अनुभव दिला. माणूस माणसाला दिसेनासा झाला. घरच्या कामवालीला ही टाळेबंदी असल्याने हुश्श्य झाले, परंतु नवरोजींना मात्र किचनमध्ये धुणीभांडी करण्यामध्ये तरबेज मात्र व्हावेच लागले. नोकरीपेशा वाल्या महिला Work from Home  करू लागल्या. खरंच या माऊलीने मात्र कमाल केली. इकडे बॉसला सांभाळा, तर मध्येच नवरोजींची पोळी न जळायला मदत करा. तारेवरची कसरत नव्हे, लॅपटॉप वरची. व्हाट्सअप वर Male या जातीचे पोळ्या करताना, पोछा लावताना, भांडी घासताना व्हिडिओ वर व्हिडिओ पोस्ट होऊ लागले. त्यात मुलांची लुडबुड पण अनुभवली पण आत्तापर्यंत ‘बाबा ‘ नावाचा प्राणी कधीकाळी दिसत होता तो 24 तास आजूबाजूला बागडायला लागल्यामुळे बच्चेकंपनीची तर चांदीची होती. त्यात शाळेत पाठवण्याची आईवडिलांची तर हिम्मतच नव्हती.

सतत त्याच त्या बातम्या पाहून पाहून शब्दकोशात मात्र भरपूर भर पडली. काय तर Lockdown, covid-19, Isolation, Asymptomatic, बाधित, Pandemic, Quarantine, Contentment Zone, Hydroxyclorine, कोरोना टेस्ट, Social distancing .आ त्तापर्यंत दोन तीन महिने उलटून गेले होते .प्रत्येकाच्या संयमाची परीक्षा होती, कारण सर्व अर्थव्यवस्था कोलमडून गेली होती ,व्यवसाय ठप्प पडले होते. हातावरील पोट असणाऱ्या पुढे अशात जगण्या-मरण्याचा प्रश्‍न उभा ठाकला होता. बाहेर जावे तरी भीती, न जावे तर पोटापाण्याचे काय? आवश्यक सेवा, मेडिकल मात्र अव्याहत सुरू होते. जो तो आता दैनंदिन सेवेचा लाभ घ्यायला मात्र एकावर एक लोढणे चढवून जाऊ लागला. दुकानात अंतर राखणे सुरू झाले. जो-तो एकमेकाकडे साशंक नजरेने बघू लागला. न जाणू माणूस माणसाला अशा पद्धतीने पारखा होऊ लागला. हाय-हॅलो चा हशा अचानक भीतीचे रूप घेऊ लागला. माणुसकीला देखील एकमेकांच्या अंतराची सवय झाली होती.

इतका मोठा बदल सगळे कसे अचंबित भयावह नजरेने बघ्याची भूमिका घेऊन पहात होते. या महामारीचे संकटाने पुढे काय वाढून ठेवले आहे कुणाला ज्ञात नव्हते. यात विशेष कौतुक मात्र वैद्यकीय व्यवसायाचे मानावे लागेल. इत्यंभूत लक्षणे माहित असून देखील डॉक्टर्स मात्र अव्याहत रुग्णांची सेवा करीत होते. जनता कर्फ्यू च्या वेळेस मात्र जनताजनार्दन नि अतिशय भावपूर्ण घंटानाद करून कळत नकळत का होईना आभार मानले. सर्व सेवा ठप्प पडल्याने काही आई-वडिलांची पिल्ले मात्र जी परदेशात होती, कुणी नोकरीनिमित्त तर कुणी शिक्षणासाठी ,परदेशी असलेले निघू शकत नव्हते. आई-वडिलांच्या आतुरतेची ही केवढी मोठी परीक्षा होती. 

जी पिल्लं माऊलीला आधीच येऊन बिलगली होती त्या घरात मात्र सुटकेचा श्वास भिनत होता पण आता मात्र संयमाच्या बांधाला हळूहळू भेगा पडायला सुरुवात झाली. दैनंदिन कामकाजावर, व्यवसायावर, धंद्यांवर परिणामांचा असा काही उद्रेक झाला होता की चिंतेची  चमक चर्कन काळजात अचानक चमकून जात होती .ही टाळेबंदी, ही महामारी आणखी किती दिवस सहन करायची? यावर उपाय काय ?केव्हा या जाचातून मुक्त व्हायचे? अशा अनेक काळजीला खतपाणी मिळायला लागले. टीव्ही, वर्तमानपत्र, मोबाईल यावरील मृत्यूचे तांडव मात्र पाहवत नव्हते. आता तोचतोपणा नकोसा वाटू लागला होता. उगीचच मेंदूवरील कोरोनाचा ताण वाढू लागला. शारीरिक व मानसिक थकवा जाणवू लागला होता.

जाणून घ्या - हृदयद्रावक...रात्री सव्वा अकरा वाजता मायलेकींनी रेल्वे रुळावर झोपून संपविली जीवनयात्रा
 

हा हा म्हणता पाच महिने उलटून गेले आणि एक दिवस काही दिवसासाठी का होईना टाळेबंदी शिथिल करण्यात आली. हळूहळू चहलपहल दिसू लागली. मोकळ्या हवेत कैदेतून सुटल्यावर जसा श्वास घ्यावा नं अगदी तसा. जेल म्हणा अथवा काळ्यापाण्याची शिक्षा (थोडीफार तर सर्वांनाच झळ पोचली होती) सर्वदूर साशंक नजरा, अस्पृश्यता (इथे कोरोनाने काहीसे असेच भासवले होते )सोशल डिस्टंसिंग पाळणे सुरू झाली. भराभर कामे आटपून घरी परतणे चालू झाले. Sanitizer,mask यांची रेलचेल सुरू झाली. रंगीबिरंगी टोप्या उड्या मारू लागल्या. दुकानातही कधीही धुतले नसतील इतके सॅनिटायझर हातावरील निर्जंतुकीकरण  प्रक्रिया सुरू झाली .दुकानात  पाय ठेवताक्षणी दरबान जणू इन्स्पेक्टरच्या रुबाबात डोक्यावर forhead थर्मामीटर धाडकन बंदुकी सारखे लावून शरीराचे तापमान घेऊ लागला. पिशव्या घेऊन दान मागितल्या सारखे लोक गरजेचे सामान आणू लागले. कैदेतून कैदेची शिक्षा भोगून सुटावे असे लोकांनी मात्र गर्दी करण्यास सुरुवात केली की न जाणो पुन्हा लाॅक डाऊन होईल या भीतीने किराण्याचे साठेच्या साठे भरण्यात भरू लागले. बाजारात मालाची कमतरता भासू लागले. जनमानसाने या संयमाचे मात्र अजिबात पर्वा केली नव्हती .वाट फुटेल तिकडे कधी पाहिले नाही असे रस्त्यावर बेभान सुटत चालले होते.

एकीकडे रुग्णांच्या संख्येत बऱ्यापैकी घट दिसत असताना मात्र कोरोना carrier यांनी पुन्हा डोके वर काढले .सोशल डिस्टंसिंग ची ऐसी की तैसी करून टाकली होती .पोलीस ताफ्याची त्रेधातिरपीट होत होती. तेव्हा निव्वळ ठराविक भागांमध्ये हैदोस घालणारा हा ब्रह्मराक्षस आता हाहाकार करू लागला लागला व आग ओकू लागला. निवळलेली परिस्थिती पुन्हा बिकट व्हायला लागली. यात ज्येष्ठ नागरिकांनी जे स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मले होते त्यांनी त्याकाळी प्लेग, कॉलरा, देवी अशा महामारी चे एक तर अनुभव किंवा जवळपास वर्णाने ऐकली असतील. स्वातंत्रोत्तर काळात चिकनगुनिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू अन आताचा कहर म्हणजे कोरोना. कलियुग म्हणतात ना ते हेच होय.

लेखिका - नंदिनी गोडबोले

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the corona virus changed everyone life