कोरोनाची धडकी; कार्यक्रमांना कात्री

korona vairas
korona vairas

खामगाव (जि. बुलडाणा) : चीन पाठोपाठ आता भारत देशातही कोरोना संशयित रुग्‍ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात अद्याप कोणाला कोरोनाची लागण झाल्‍याची घटना समोर आली नाही. मात्र, दक्षतेचा उपाय म्‍हणून आरोग्‍य विभागाने जागृती सुरू केली आहे. विशेष म्‍हणजे अनेकांच्‍या मोबाईल डायलर टोनवरही कोरोनाबाबत जागृती केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. तर दक्षता म्‍हणून अनेक ठिकाणी होणारे धुलीवंदनाचे कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहे.

अनेक उपाययोजनाची देण्यात येत आहे माहिती
काेरोनाच्‍या पार्श्वभूमीवर जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने विशेष उपाययोजना करण्यात आल्‍या आहे. शिवाय जिल्‍ह्यातील तालुका व ग्रामीणस्‍तरावरील मोठ्या रुग्‍णालयात स्‍वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. विविध माध्यमातून कोरोनाबाबत घ्यावयाच्‍या दक्षतेची जागृतीही केली जात आहे. विशेष म्‍हणजे एक-दोन दिवसांपासून अनेकांच्‍या मोबाईलच्‍या डायलर टोनवरही कोरोनाबाबत जागृतीची धून वाजत आहे. यात कोरोनाबाबत घ्यावयाच्‍या दक्षतेची माहिती दिली जात आहे. 6 मार्च रोजी जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने खामगाव उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ज्‍या ठिकाणी जास्‍तीत-जास्‍त नागरीक एकत्र येतात अशा ठिकाणी लाऊडस्‍पीकर लावून या आजाराबाबत ध्वनीफितीद्वारे जनजागृतीपर संदेश देण्याचे आदेश देण्यात आले असल्‍याचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्‍हाण यांनी सांगितले होते. मोठ्या अधिकाऱ्यांसह इतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या मोबाईलवर ही डायलर टोन ऐकू येत आहे. त्‍यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्‍या उपाययोजनांची जागृती होण्यास मदत होत आहे. नागरिकांनी गर्दी होणारे अनेक कार्यक्रम रद्द करावे असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने वारंवार करण्यात येत आहेत.

चिंचोली येथील संत अवलिया मेळावा रद्द
कोरोना व्‍हायरसचा प्रभाव राज्‍यातही वाढत असून, याचीच धास्‍ती घेत बुलडाणा जिल्‍ह्यात होळी निमित्त सैलानी येथे भरत असलेल्‍या यात्रेला प्रशासनाच्‍या वतीने स्‍थगिती देण्यात आली आहे. त्‍याच धर्तीवर खामगाव तालुक्‍यातील चिंचोली येथील ग्रामस्‍थांच्‍या वतीने सामाजिक बांधिलकीचा दृष्टीकोन ठेवून दरवर्षी आयोजित होणारा संत अवलिया मेळावा चिंचोली ग्रामस्‍थांच्‍या संमतीने रद्द करण्यात आला आहे.

बसस्‍थानकावर चाहक, वाहकांच्‍या वतीने जनजागृती
कोराेना व्‍हायरस बाबत जनजागृतीच्‍या दृष्टीने खामगाव आगाराअंतर्गत चालक, वाहकांच्‍या वतीने बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्‍वच्‍छतेची माहिती देण्यात येत असून, या आजारापासून स्‍वतःला वाचविण्यासाठी कोणती सावधता बाळगावी याबद्दल सांगण्यात येत आहे. याबाबतचे निर्देश विभागीय नियंत्रक बुलडाणा यांच्‍याकडून अधिकृतरित्‍या प्राप्‍त झाल्‍याची माहिती खामगाव स्‍थानक प्रमुखांनी दिली.

खबरदारी घेणे गरजेचे
आपल्‍या भागात अजून पर्यंत कोणताही संशयीत रुग्‍ण आढळला नाही. मात्र, खबरदारी घेणे हे प्रत्‍येकाचे कर्तव्‍य बनते. या व्‍हायरस पासून बचावाकरिता वैयक्‍तिक पातळीवर स्‍वच्‍छता पाळणे गरजेचे आहे.
-अनिता डवरे, नगराध्यक्ष, खामगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com