esakal | coronavirus : दोन सापडले एक बेपत्ताच; फॉरेन रिर्टनच्या मागे अशी होतेय दमछाक
sakal

बोलून बातमी शोधा

corona .jpg

जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नसला, तरी संशयितांच्या संख्येत वाढ होत आहे. विदेशातून येणाऱ्यांसह शनिवारी पुणे-मुंबई, नागरपूर सारख्या कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या शहरातूनही मोठ्या संख्येने नागरिक अकोल्यात आले आहेत.

coronavirus : दोन सापडले एक बेपत्ताच; फॉरेन रिर्टनच्या मागे अशी होतेय दमछाक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : विदेशातून जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन प्रवाशांपैकी दोघांचा जिल्हा प्रशासनाशी संपर्क झाला आहे. तर इतर एकाचा अद्यापही संपर्क झालेला नाही. तेव्हा त्या तिघांपैकी दोनजण सापडले असून, एकजण अद्यापही बेपत्ता आहेत. त्या एकाचा शोध पोलिसांसह जिल्हा प्रशासन घेत आहे.

केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून प्राप्त यादीनुसार, विदेशातून जिल्ह्यात 75 प्रवासी दाखल झाले. त्यापैकी 74 प्रवासी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आले. मात्र, तिघांशी अद्यापही संपर्क होऊ शकलेला नाही. जिल्हा प्रशासनाने या तिघांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये ह्युस्टनमधून आलेले पंकज जलपाल पटेल, इंडोनेशियातून आलेले शुभम तिवारी, तर शारजाहून आलेले रितेश यांचा समावेश आहे. या पैकी जलपाल पटेल आणि शुभम तिवारी यांनी प्रशासनाशी संपर्क केला तर उर्वरित एकडण अद्याप संपर्कात नाही.

महत्त्वाची बातमी - विदेशातून आलेल्या आठ नागरिकांचे होम क्वारंटाईन

कोरोनाचा आणखी एक संशयित रुग्ण दाखल
सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात दाखल चौघांचा वैद्यकीय अहवाल निगेटीव्ह आला आहे, तर शनिवारी कोरोनाचा आणखी एक संशयित रुग्ण दाखल झाला आहे. शिवाय, पुणे-मुंबई येथून आलेल्या 577 प्रवाशी नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्याना 14 दिवसांसाठी होम क्वारंटीन’ राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोठ्या संख्येने नागरिक अकोल्यात
जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नसला, तरी संशयितांच्या संख्येत वाढ होत आहे. विदेशातून येणाऱ्यांसह शनिवारी पुणे-मुंबई, नागरपूर सारख्या कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या शहरातूनही मोठ्या संख्येने नागरिक अकोल्यात आले आहेत. यासर्व प्रवाशी नागरिकांची शनिवारी सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना समुपदेशन कक्षात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या ठिकाणी काही नागिरांना सर्दी, खोकला आणि ताप असल्याचे लक्षण आढळून आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या सर्वांनाच 14 दिवस घरीच थांबण्याचा सल्ला दिला.

loading image