विषाणू धुमाकूळात ‘स्थायी’ची सभा आज

CoronaVirus: akola zp Standing meeting today
CoronaVirus: akola zp Standing meeting today

अकोला : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी (ता. 27) दुपारी 1 वाजता राजश्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात होणार आहे. सभेच्या नोटीसमध्ये मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्याच्या एकमात्र विषयाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सभेत सत्ताधारी वेळेवर विषय मांडून ते मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करतील. विशेष म्हणजे देशभरात कोरोणा विषाणुने धुमाकूळ घातलेला असतानाच सदर सभा होत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने मोजक्याच अधिकाऱ्यांना सभेला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. 


जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 53 पैकी सर्वाधिक 25 जागा भारिप-बमंसला मिळाल्या. त्यासोबत महाविकास आघाडीतील शिवसेनेला 13, कॉंग्रेस -4 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला 3 जागा मिळाल्या. तिसऱ्या क्रमांकाच्या 7 जागा मिळालेल्या भाजपने अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकी दरम्यान सभागृहातून बहिर्गमन केले. त्यानंतर झालेल्या विषय समिती सदस्यांच्या निवड प्रक्रियेत शिवसेनेला झुकते माप मिळाले. सभागृहात स्पष्ट बहुमत नसल्याने भारिप-बमंसला कोंडीत पकडण्याची संधी विरोधक शोधतात. दरम्यान मागील सर्वसाधारण सभेप्रमाणेच यासभेत सुद्धा सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. सदर सभेच्या नोटीसमध्ये 20 मार्च रोजी पार पडलेल्या सभेचे इतिवृत्त कायम करण्याच्या एकमात्र विषयाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु सभेत अध्यक्ष प्रतीभा भोजणे यांच्या परवानगीने वेळेवर विषय मंजुरीसाठी ठेवण्यात येतील. सभेत सर्व विषय समित्यांचे सभापती व प्रभारी मुख्य कार्यकारीअधिकारी डॉ. सुभाष पवार सुद्धा उपस्थित राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com