esakal | CoronaVirus : आपत्ती काळात हे देखील प्रवाश्‍यांना लुटताय
sakal

बोलून बातमी शोधा

lakzari vashi.jpeg

पुणे- मुंबई येथे कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी, उच्च शिक्षणासाठी तिथे गेलेले विद्यार्थी कोरोनाच्या धास्तीमुळे गावाकडे परत येत आहेत. तेथून येणाऱ्या वाहनांची संख्या कमी असल्याने त्याचा फायदा ट्रॅव्हल्स कंपनी मालक घेत आहेत. यापूर्वी पुणे येथून 700 रुपयांपर्यंत भाडे होते. आता या ट्रॅव्हल्स कंपन्यांचे संचालक तिप्पटपेक्षा जास्त म्हणजे दोन हजार 300 रुपयांपर्यंत आकारल्या जात आहे.

CoronaVirus : आपत्ती काळात हे देखील प्रवाश्‍यांना लुटताय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (वाशीम) : ‘कोरोना’ सारख्या राष्ट्रीय आपत्ती काळात लक्झरी बसकडून पुणे-मुंबई कडून येणाऱ्या प्रवाशांची लूट होत आहे. पुणे- मुंबई येथून येणाऱ्या प्रवाशांना नेहमी आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या अडीचपट जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र जैन यांनी परिवहन मंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.

हेही वाचा- अबब...! रेती माफियांनी केला चक्क पोलिसांना चिरडून करण्याचा प्रयत्न

ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाईची मागणी
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, पुणे- मुंबई येथे कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी, उच्च शिक्षणासाठी तिथे गेलेले विद्यार्थी कोरोनाच्या धास्तीमुळे गावाकडे परत येत आहेत. तेथून येणाऱ्या वाहनांची संख्या कमी असल्याने त्याचा फायदा ट्रॅव्हल्स कंपनी मालक घेत आहेत. यापूर्वी पुणे येथून 700 रुपयांपर्यंत भाडे होते. आता या ट्रॅव्हल्स कंपन्यांचे संचालक तिप्पटपेक्षा जास्त म्हणजे दोन हजार 300 रुपयांपर्यंत आकारल्या जात आहे. ऑन लाईन बुकिंग मध्येही हे दर आहेत. ट्रॅव्हल्स कंपन्यांनी 16 मार्चपासून ही भाडेवाढ केली आहे. याला आळा घालून प्रवाशांची लूट करणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.