esakal | आठ लाखांच्या पुलात भ्रष्टाचारच भ्रष्टाचार
sakal

बोलून बातमी शोधा

pool.

पिंडकेपार गावानजीक मुख्य कुऱ्हाडीकडे जाणाऱ्या मार्गावर जिल्हा निधीतून पुलाचे बांधकाम करण्यासाठी 8 लाख मंजूर करण्यात आले. ते बांधकाम एका संस्थेमार्फत करण्यात आले. अभियंता यांनी मंजूर (इस्टीमेंट) आराखड्यानुसार कंत्राटदारांकडून पुलाचे बांधकाम करवून घेतले नाही. त

आठ लाखांच्या पुलात भ्रष्टाचारच भ्रष्टाचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोरेगाव (जि. गोंदिया) : तालुक्‍यातील पिंडकेपार ते कुऱ्हाडीकडे जाणाऱ्या मार्गावर जिल्हा निधीतून 8 लाख रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम करण्यात आले. त्या बांधकामात अभियंता यांच्या निर्देशानुसार कंत्राटदार यांनी बजरीऐवजी गिट्टीचा वापर केला. मातीमिश्रित वाळूचा वापर करून सिमेंटचा कमी प्रमाणात उपयोग करण्यात आला. या निकृष्ट बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी सरपंच, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी केली आहे. याबाबतची तक्रार आमदार मनोहर चंद्रिकापुरे , जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता यांनी केली आहे.

पिंडकेपार गावानजीक मुख्य कुऱ्हाडीकडे जाणाऱ्या मार्गावर जिल्हा निधीतून पुलाचे बांधकाम करण्यासाठी 8 लाख मंजूर करण्यात आले. ते बांधकाम एका संस्थेमार्फत करण्यात आले. अभियंता यांनी मंजूर (इस्टीमेंट) आराखड्यानुसार कंत्राटदारांकडून पुलाचे बांधकाम करवून घेतले नाही. तसेच या बांधकामस्थळी भेट दिली नाही. त्यामुळे कंत्राटदार यांनी बांधकाम करताना बजरीऐवजी मोठी गिट्टी, माती मिश्रित वाळू वापरून सिमेंट कमी टाकले आहे. तसेच फुटलेल्या सिमेंट पाइपचा वापर केला आहे.

या पुलाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तलावाचे पाणी खरीप हंगामातील धान पिकासाठी वापरल्या जात असल्याने पुलाचे बांधकाम पाहण्यासाठी सरपंच,तंमुस अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी गेले असता त्यांना निकृष्ट बांधकाम होत असल्याचे आढळून आले. या बांधकामाची माहिती अभियंता यांना देण्यात आली. अभियंता यांनी पुलाच्या बांधकामाची चौकशी करून पुन्हा भिंत टाकण्याचे कंत्राटदारास सांगितले. तरीसुद्धा कंत्राटदाराने याकडे दूर्लक्ष करून अर्धवट भिंत जेसीबीने पाडून पुन्हा भिंत तयार केली व सिमेंट पाणी टाकून प्लास्टर केले आहे.

जिल्हा निधीतून 8 लाख रुपये बांधकामात खर्च करून पुलाचे काम निकृष्ट झाल्याने पूल एक वर्षात भुईसपाट होणार ही भिती गावकऱ्यांना आहे त्यामुळे या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, कंत्राटदार, अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात यावी, पुलाचे बांधकाम पुन्हा करण्यात यावे, अशा मागणीचे तक्रार अर्ज सरपंच दुलीचंद रहांगडाले, उपसरपंच रविशंकर नागोसे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजेंद्रनाथ मेश्राम, भीमा शहारे,दीपक बोपचे,दिलीप पटले,मनोज बिसेन, सुरेश भांगारे, महेंद्र लटये,कुंवरलाल भोयर व गावकऱ्यांनी केली आहे.

सविस्तर वाचा - या समितीच्या शिफारशी ओबीसींसाठी ठरणार घातक... आरक्षणावर गदा?

पिंडकेपार पुलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याची तक्रार आली आहे. त्यामुळे कंत्राटदारास पुन्हा भिंतींचे बांधकाम करण्यास सांगितले आहे. योग्य बांधकाम होईपर्यंत त्याची बिले थांबविण्यात येतील.
मुंदडा, उपविभागीय अभियंता, जिल्हा परिषद, गोंदिया


संपादन - स्वाती हुद्दार