esakal | शेणखताला आला सोन्याचा भाव; तुटवडा निर्माण झाल्यामुळे एका ट्रॅक्‍टर ट्रॉलीचा भाव तब्बल दर दोन हजार रुपये 
sakal

बोलून बातमी शोधा

Cost of Manure get increased due to shortage in Gondia district

ग्रामीण भागात पशुधन कमी झाल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण झाला. या तुटवड्यामुळे सद्यःस्थितीत सोनेरी दिवस आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेणखत शेतीसाठी अत्यंत फायदेशीर असून, या खताचा वापर शेतजमिनीत झाल्यास शेतजमिनीचा पोत सुधारते. दर्जेदार उत्पादनासाठी शेणखत फायदेशीरच आहे.

शेणखताला आला सोन्याचा भाव; तुटवडा निर्माण झाल्यामुळे एका ट्रॅक्‍टर ट्रॉलीचा भाव तब्बल दर दोन हजार रुपये 

sakal_logo
By
संतोष रोकडे

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) ः रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची पोत घसरत चालली आहे. त्यामुळे जमिनीची पोत सुधारावी, याकरिता शेतकरी शेणखताचा वापर करण्याकडे वळले आहेत. मात्र, पशुधनात होणाऱ्या घटीमुळे शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. एक ट्रॅक्‍टर ट्रॉली शेणखत दीड हजार ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत.

ग्रामीण भागात पशुधन कमी झाल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण झाला. या तुटवड्यामुळे सद्यःस्थितीत सोनेरी दिवस आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेणखत शेतीसाठी अत्यंत फायदेशीर असून, या खताचा वापर शेतजमिनीत झाल्यास शेतजमिनीचा पोत सुधारते. दर्जेदार उत्पादनासाठी शेणखत फायदेशीरच आहे. तसेच मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. नुकत्याच पाच डिसेंबरला जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून शेतजमिनीत शेणखताचे महत्त्व कृषी विभागाकडून अधोरेखित झाले आहे.

अधिक वाचा - Good News : सोने ५० हजारांच्या खाली; पाच हजारांनी वधारण्याची शक्यता कायम

शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये तशी जनजागृती करण्यात येत आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापराने मानवी आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून शेतजमिनीची आरोग्य पत्रिका तयार करणे व त्यानुसार जमिनीला कोणते घटक आवश्‍यक आहेत, तीच मात्रा देण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध पिके घेतल्यानंतर शेतातून निघणारा पालापाचोळा आणि त्यात शेणखत टाकून त्याचे कंपोस्ट खत तयार करता येते. 

गोंदिया जिल्ह्याला धान्याचे कोठार म्हणून ओळखले जाते. मुख्य पीक धान असून, वर्षानुवर्षे एकच पीक घेतल्याने जमिनीचा पोत खालावत चालला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पिकांची फेरपालट करण्याची आवश्‍यकता आहे. गाई, म्हशी, शेळी यांचे शेण व मलमूत्र, तसेच गोठ्यातील इतर केरकचरा आदी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात. चांगल्या कुजलेल्या शेणखताच्या एका ट्रॉलीचे दर दीड ते दोन हजार रुपये आहे. असे असले तरी रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे पुन्हा एकदा शेणखताची मागणी वाढली आहे. शेणखतामध्ये नत्र, स्फूरद, पलाश असते. सेंद्रिय कर्ब हा जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. मातीतील जैविक घटकांच्या वाढीसाठी चांगले कुजलेले शेणखत फायदेशीर ठरते. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारते व उत्पादनात वाढ होते.

क्लिक करा -सालेकसातील शेतात आढळला मांजरीसारखा दिसणारा प्राणी; जवळ जाऊन बघितले असता अंगाचा उडाला थरकाप

रासायनिक खतामुळे पिकांवर होतात दुष्परिणाम

शेतीमध्ये रासायनिक खताचा अधिक वापर केल्याने जमिनीची पोत खराब होते. पर्यायाने शेतजमीन भविष्यात नापिक होण्याचा धोका संभवतो. पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत जातो. रासायनिक खतामुळे पाण्याचे स्रोतही दूषित होतात. जमिनीतील कस टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त जिवाणूंना मारक ठरतात.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image