दसऱ्यानंतरच "पणन'ची कापूस खरेदी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

यवतमाळ : कापूस खरेदीचा मुहूर्त जवळ येत आहे. त्यासाठी राज्य कापूस पणन महासंघाचे नियोजन सुरू आहे. यंदाही दसऱ्यानंतर "पणन'च्या खरेदीचा मुहूर्त निघणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. गेल्यावर्षी असलेल्या हमीभावात यंदा 100 रुपयांची वाढ करण्यात आली असून, दर पाच हजार 550 रुपयांवर आहे.

शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी होऊ नये यासाठी हमीभाव केंद्र सुरू केले जातात. मात्र, बरेचदा अर्धा हंगाम संपल्यावर केंद्र सुरू होतात. मागील वर्षी कापूस पणन महासंघाने ऑक्‍टोबरपासून राज्यात कापूस खरेदीला सुरुवात केली होती. गेल्यावर्षी एकाचवेळी जिल्ह्यातील सर्व केंद्रे सुरू करण्यात आली होती. यंदाही दसऱ्यानंतरच जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील कळंब, यवतमाळ, पुसद व आर्णी या ठिकाणी प्रत्येकी दोन केंद्रे सुरू करण्यात आलेली होती. यंदाही सात केंद्र जिल्ह्यात सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी पणन महासंघाचे नियोजन सुरू आहे. यंदा जिल्ह्यात साडेचार लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड झालेली आहे. सध्या पीकपरिस्थिती समाधानकारक असल्याने कापसाचे उत्पन्न वाढण्याची शक्‍यता आहे. मात्र, बोंडअळीची भीती शेतकऱ्यांमध्ये असल्याने पीक हातात येईपर्यंत उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या मनात साशंकताच आहे.
लवकर केंद्र उघडण्याची शेतकऱ्यांची मागणी
पणन महासंघाने लवकर केंद्र उघडल्यास शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात कापूस विकावा लागणार नाही. दसऱ्यादरम्यान केंद्र उघडल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होईल. त्यामुळे पणन महासंघाने त्यादृष्टीने विचार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cotton centers will start After Dasehra