esakal | कपाशीवर बोंडसळ; तुडतुड्यांचे आक्रमण; पांढऱ्या माशीचा धोका
sakal

बोलून बातमी शोधा

कपाशीवर बोंडसळ; तुडतुड्यांचे आक्रमण; पांढऱ्या माशीचा धोका

कपाशीवर बोंडसळ; तुडतुड्यांचे आक्रमण; पांढऱ्या माशीचा धोका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : अतिवृष्टीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांसमोर एकामागून एक संकटे येतच आहेत. एक संकट कमी होताच दुसरे संकट समोर दिसत आहे. बोंडसळनंतर आता तुडतुडे, रसशोषण करणारी किड तर पावसानंतर पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा मोठे संकट घोंघावत आहे.

हेही वाचा: NCBला रेव्ह पार्टीची माहिती देण्यासाठी गेलो होतो: भानुशाली

यंदा शेतकर्‍यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतीवर नैसर्गिक व इतर संकटेही आलेली आहेत. सोयाबीन बियाण्यांची अडचण, खतांचा तुटवडा, अतिवृष्टी व पुरामुळे झालेले पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, सोयाबीनला फटका अशी अनेक संकटांचा सामना शेतकरी करीत आहेत. अशातच आता कपाशीवर बोंडसळ, तुडतुडे यासह पांढरी माशी, रसशोषण करणार्‍या किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे.

त्याचा फटका शेतकर्‍यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, कपाशी उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकर्‍यांना आणखी एका मोठ्या संकटाला तोंड देण्याची वेळ येणार आहे. यामुळे कपाशीच्या झाडांची पाने, पाती व बोंडसळ होण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. आधीच अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे पीक उद्ध्वस्त झाले. यानंतर आता या रोगाचा धोका वाढला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आधीच उपाययोजना करून धोका टाळण्याची गरज असल्याचे कृषी विज्ञान केंद्राने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोघांना; हे आहेत मानकरी

पावसाचा धोका कायम

अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात घट येत आहे. असे असताना हवामान विभागाने आणखी पावसाचा धोका असल्याचे संकेत दिले आहे. त्याचा परिणाम कपाशीवर जास्त होण्याचा धोका वाढला आहे. शेतकर्‍यांवर एकामागून एक संकटे येत आहेत. आता पुन्हा पावसाचा अंदाज असल्याने शेतकर्‍यांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारत येत नाही.

"परिस्थितीचे भान ठेवून शासन निश्‍चितच शेतकर्‍यांना आर्थिक मदत देईलच, अशा विश्‍वास आहे. असे असले तरी शेतकर्‍यांनी पिकांवर बुरशीनाशक तसेच जिवाणुनाशकांची फवारणी करावी."

- डॉ. प्रमोद यादगिरवार, सहयोगी संशोधन संचालक, मध्य विदर्भ विभाग, यवतमाळ

loading image
go to top