
शेतकऱ्यांचा कापूस शेतात फुटला असताना आलेल्या पावसामुळे तो बऱ्याच प्रमाणात ओला झाला. हवामान खात्याने पुन्हा दिलेल्या चेतावणीमुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांनी होता
वर्धा : दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांचा कापूसही शेतातून घरी आला आहे. परंतु, पणन महासंघ आणि सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या कापसाला साडेचार ते पाच हजार रुपये दर देण्यात येत आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हमीभावाची प्रतीक्षा लागली आहे..
शेतकऱ्यांचा कापूस शेतात फुटला असताना आलेल्या पावसामुळे तो बऱ्याच प्रमाणात ओला झाला. हवामान खात्याने पुन्हा दिलेल्या चेतावणीमुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांनी होता त्या अवस्थेत कापूस वेचला. या कापसात बऱ्याच प्रमाणात पावसामुळे आद्रता असल्याने तो घरी साठवून ठेवल्यावर काळा येणे सुरू झाले आहे. हा कापूस आणखी खराब होण्यापेक्षा तो विकण्यास शेतकरी पसंती देत आहे. पण, त्यांना भाव मिळत नसल्याने त्यांची चांगलीच पंचाईत होत आहे.
सोयाबीन गेल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी आलेला कापूस विकण्याची तयारी दर्शविताच ग्रामीण भागात कापूस खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांच्या घरासमोर घिरट्या घालू लागले. यात काही शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्यांना त्यांचा कापूस दिला. यात त्यांना साधारणत: हजार ते दीड हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. यामुळे शिल्लक असलेल्या कापसाला हमीभाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची असून याकरिता शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
हेही वाचा - अपहरणानंतर विवाहितेवर सामूहिक अत्याचार, फेसबुकवरून झाली होती ओळख
शेतकऱ्यांचा कापूस घरी पडून आहे. तो घरीच खराब होण्याची वेळ आली असताना सीसीआय आणि पणन महासंघाच्या वतीने अद्यप खरेदी केंद्र सुरू केले नाही. यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांच्या दारी जावे लागत आहे. यात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पाच हजाराच्या आसपास दर मिळत आहे. अशात येत्या दिवसात खासगी बाजारातही कापसाचे दर वाढण्याचे संकेत मिळत आहे. यातच जर हमीकेंद्र सुरू झाले तर कापसाचे भाव आणखी वाढेल असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
संपादन - अथर्व महांकाळ