esakal | मजुरांअभावी पांढरे सोने शेतातच, कापूस उत्पादनातही मोठी घट
sakal

बोलून बातमी शोधा

cotton production decreases in wardha

यावर्षी सुरुवातीपासून कापसावर गुलाबी बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला. पावसाने कपाशीचे बोंडे ही काळवंडली. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊन कापूस शेती संकटात आली आहे.

मजुरांअभावी पांढरे सोने शेतातच, कापूस उत्पादनातही मोठी घट

sakal_logo
By
मनोज रायपुरे

वर्धा : दिवसेंदिवस शेती करणे जिकरीचे काम होत आहे. गुलाबी बोंडअळीमुळे यंदा कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यातच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बाहेर राज्यातील मजूर आले नाही. डिसेंबर महिना उलटत चालला तरी वेचणीला मजूर मिळत नसल्याने पांढरे सोने शेतातच असून शेतकरी चिंताग्रस्त आहे. 

हेही वाचा - पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवड्याला झुकते माप? अमरावती विभागाला फक्त ९२ लाखांचा टंचाई...

कापसाचा दर 50 रुपये आणि वेचण्यासाठी 20 रुपये प्रती किलो खर्च, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपतच नाही. कधी निसर्गाची उदासीनता तर कधी शासनाचे शेतकरीविरोधी धोरण मारक ठरते आहे. उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी बिकट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. बोंडअळी आणि बोंडसडीमुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. कापसाचे उत्पादन अर्ध्यावरच आले आहे. कपाशीचे शेत पांढरे झाले आहे, पण मजूर मिळत नसल्याने कापूस झाडावरच मातीमोल होण्याची भीती हिंगणघाट तालुक्‍यातील शेतकऱ्यांमध्ये व्यक्‍त केली जात आहे. 

हेही वाचा - खरीपाचे पूर्ण नुकसान होऊनही नव्या जोमाने रब्बीकडे वळला...

शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कपाशी पिकावर अवलंबू असते. सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना कपाशी पिकावर जास्त खर्च करावा लागतो. त्या तुलनेत कापूस उत्पादन होत नाही. यावर्षी सुरुवातीपासून कापसावर गुलाबी बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला. पावसाने कपाशीचे बोंडे ही काळवंडली. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊन कापूस शेती संकटात आली आहे.

हेही वाचा - कॉंग्रेसच्या अधिवेशनापासून अधिक तीव्र झाली होती स्वातंत्र्य चळवळ; नागपूर अधिवेशनाला तब्बल १०० वर्ष...

निम्मा कापूस मजुरीत -
कापूस वेचणाऱ्या महिलांना 200 रुपये रोज मजुरी असून ती दिवसाला 8 ते10 किलो कापूस वेचते. सध्या खुल्या बाजारात कापसाला 48 ते 52 रुपये किलो भाव मिळत आहे. तर तो वेचणीसाठी 25 रुपये किलो. वेचणी सोडून केवळ 25 रुपये शेतकऱ्यांच्या हातात येत आहे. यातून बहुतांश शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चपण निघणार नाही, हे कळून चुकले आहे. कापूस पिकावर होणारा खर्च मोठा आहे.