esakal | खरीपाचे पूर्ण नुकसान होऊनही नव्या जोमाने रब्बीकडे वळला शेतकरी; पेरणी क्षेत्रात वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

 rabbi sowing area increases in amravati

यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना निसर्गाच्या अवकृपेने वाईट गेल्याने खरिपातील शेतकरी रब्बी हंगामाकडे वळला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाचे शेत मोडून रब्बीतील चना व गव्हाची पेरणी केली.

खरीपाचे पूर्ण नुकसान होऊनही नव्या जोमाने रब्बीकडे वळला शेतकरी; पेरणी क्षेत्रात वाढ

sakal_logo
By
कृष्णा लोखंडे

अमरावती : रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात वाढ होत असून गव्हाच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. जानेवारी महिन्यातही गव्हाची पेरणी होत असल्याने पेरणी क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्‍यता कृषी अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. आठवडाभरात पेरणीक्षेत्र दहा टक्‍क्‍यांनी वाढले असून गव्हाचे क्षेत्र वाढले आहे.

हेही वाचा - "साहब, वो झोपडीमे नही आते, उनकी फोटो लगाके त्यौहार मनाता लेता हू!"   

यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना निसर्गाच्या अवकृपेने वाईट गेल्याने खरिपातील शेतकरी रब्बी हंगामाकडे वळला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाचे शेत मोडून रब्बीतील चना व गव्हाची पेरणी केली. जिल्ह्यात रब्बी हंगामात 1 लाख 45 हजार 181 हेक्‍टर क्षेत्रात पेरणी केली जाते. आतापर्यंत एकूण पेरणी क्षेत्राच्या तुलनेत 1 लाख 59 हजार 968 हेक्‍टर क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र चन्याखाली आले असून 1 लाख 17 हजार 363 हेक्‍टर क्षेत्रात चन्याची पेरणी झाली आहे, तर गव्हाची 36 हजार 829 हेक्‍टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. गेल्या आठवड्यात गव्हाचे पेरणीक्षेत्र दहा टक्‍क्‍यांनी वाढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 110 टक्के पेरणी झाली आहे.

हेही वाचा - पॅनलचा खर्च करणार कोण? उमेदवारांपुढे पेच; गुडघ्याला...

जिल्ह्यात सिंचनाची सोय बघता गव्हाची पेरणी जानेवारीच्या अखेरपर्यंत केली जाते. सोयाबीनचे शेत मोकळी होत आहेत. ओलीतांची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी गव्हासाठी मशागत सुरू केली आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामात गव्हाचे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा - विद्यार्थी शिक्षणापासून वंचित; कारण, शाळा सुरू पण एसटी...

यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना समाधानकारक गेला नाही. अतिपावसामुळे मुग व उडदाचे नुकसान झाले, तर सोयाबीन पिकालाही फटका बसला. जिल्ह्यात 41 हजार हेक्‍टर क्षेत्रातील सोयाबीन पूर्णतः नष्ट झाले होते. त्यानंतरही उर्वरित क्षेत्रात सरासरी समाधानकारक आली नाही. कापसाला बोंडसडीचा फटका बसला आहे. त्यामुळे अधिक संख्येने शेतकरी रब्बी हंगामाकडे वळला आहे. त्याचा परिणाम यंदा रब्बीचे पेरणीक्षेत्र वाढण्यात होऊ लागले आहे, असे  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.
 

loading image
go to top