esakal | खासगी बाजारात कापसाच्या दरात वाढ, पणनचे कापूस केंद्र बंद
sakal

बोलून बातमी शोधा

cotton rate increases in private market in yavatmal

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने यंदा दिवाळीनंतर जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात यवतमाळ, कळंब व आर्णी असे तीन खरेदी केंद्रे उघडली. त्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती.

खासगी बाजारात कापसाच्या दरात वाढ, पणनचे कापूस केंद्र बंद

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने जिल्ह्यातील पाच कापूस संकलन केंद्रे बंद केली आहेत. पणनने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी संपली आहे. खासगी बाजारात कापसाचे दर सहा हजारांवर गेले आहेत. गेल्या दोन दिवसांत कापूस खरेदी झाली नसल्याने केंद्र ओस पडले असून मंगळवार (ता.16) पासून पणनची पाच केंद्रे बंद होणार आहेत. कापसाचा हंगामच संपला की काय, असे वाटू लागले आहे. 

हेही वाचा - जेवणासाठी बाहेर गेलेल्या मुलाची २८ दिवासांनी फक्त मिळाली कवटी; टी-शर्ट बघताच आईने फोडला हंबरडा

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने यंदा दिवाळीनंतर जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात यवतमाळ, कळंब व आर्णी असे तीन खरेदी केंद्रे उघडली. त्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. याठिकाणी एक लाख क्विंटल कापसाची नोंदणी शेतकऱ्यांनी केली होती. केंद्रावर होणारी शेतकऱ्यांची गर्दी पाहता दुसऱ्या टप्प्यात महागाव तसेच पुसद हे दोन केंद्रे सुरू करण्यात आले होते. खासगी बाजारात कापसाला कमीभाव असल्याने शेतकऱ्यांची पसंती पणनच्या केंद्रांना होती. यंदा पणन महासंघाने जिल्ह्यात चार लाख 33 हजार 652 क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. पाच केंद्रातील 14 जिनिंगवर 17 हजार 96 शेतकऱ्यांनी 248 कोटी 27 लाख रुपयांचा कापूस विकला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पणनकडे मोठ्या प्रमाणात कापूस आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून खासगी बाजारात कापसाचे दर वाढत आहेत. खासगी बाजारात सध्या कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दर मिळत आहे. परिणामी, शासकीय केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रावर कापसाचे एक बोंडही खरेदी झालेले नाही. त्यामुळे महासंघाने केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कापूस येत नसल्यामुळे पणन महासंघाने यंदाच्या हंगामातील खरेदी आटोपती घेतली असून मंगळवारपासून जिल्ह्यातील सर्व केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - ‘मुलांनो, आम्हाला माफ करा; आमचे मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करा’ अशी चिठ्ठी लिहून दाम्पत्याची...

चार लाख क्विंटल कापसाची खरेदी -
यंदा पणन महासंघाने जिल्ह्यातील पाच केंद्रातील 14 जिनिंगमध्ये खरेदी केली. हंगामात महासंघाने साडेचार लाख 33 हजार क्विंटल कापूस खरेदी केला. पणनने 17 हजार 96 शेतकऱ्यांकडून 248 कोटी 27 लाख रुपयांची कापूस खरेदी केली आहे. यातील 15 हजार 903 शेतकऱ्यांना 231 कोटी 82 लाख रुपयांचे पेमेंट दिले आहे. अजूनही एक हजार 193 शेतकऱ्यांचे पेमेंट पणनकडे शिल्लक आहे.
 

loading image